Scene of the fatal accident at Talwadi Chowk on Pune-Solapur highway where a woman was hit by a dumper Saam tv
मुंबई/पुणे

Pune Accident : रस्ता ओलांडताना घात झाला; भरधाव डंपरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू, परिसरात हळहळ

Pune Accident News : पुण्यात रस्ता ओलंडताना भरधाव डंपरच्या धडेकत महिलेचा मृत्यू झाला आहे. माजी पोलीस पाटील गोळे यांच्या पत्नीचा अपघाती मृत्यू झालाय.

Vishal Gangurde

सागर आव्हाड, साम टीव्ही

Pune Road Accident : पुण्यात अपघाताची धक्कादायक घटना घडली आहे. पुणे - सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तळवाडी चौकात अपघाताची ही दुर्दैवी घटना घडली आहे. रस्ता ओलांडणाऱ्या एका 50 वर्षीय महिलेला डंपरने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. पुणे-सोलापूर महामार्गावर सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

प्रमिला अशोक गोळे असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सदर महिला ही उरुळी कांचनचे माजी पोलीस पाटील अशोक गोळे यांच्या पत्नी असल्याची माहिती मिळाली आहे. प्रमिला यांच्या मृत्यूने उरुळी कांचन गावात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रमिला गोळे यांना उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तळवाडी चौकातून रस्ता ओलांडून शिंदवणे रस्त्याकडे जायचं होतं. मात्र रस्त्यावर वाहतूक मोठी होती. त्यामुळे त्या रस्त्याच्या बाजूला उभ्या राहिल्या होत्या.

रस्त्याच्या बाजूला उभ्या राहिलेल्या असताना सोलापूर उरुळी कांचन गावातून एक डंपर हा महामार्गावरून यवतच्या बाजूने निघाला होता. कंटेनर वळण घेत असताना रस्त्याच्या बाजुला उभ्या राहिलेल्या प्रमिला गोळे यांना डंपरने जोरदार धडक दिली, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

दरम्यान, या अपघातात त्यांना मोठ्या जखमा झाल्या होत्या. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तात्काळ उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच त्यांचं निधन झाल्याचं सांगितलं. सदरचा डंपर हा कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील बोधे काकडे वस्ती येथील असल्याची माहिती मिळाली आहे.

कोथरुड परिसरात भीषण अपघात

पुण्यातील कोथरूड परिसरात अपघात झाला आहे. कोथरूड परिसरात असणाऱ्या वेद भवन येथील पुलावर ३ ते ४ वाहनांचा अपघात झाला. भरधाव वाहने एकमेकांना धडकली. या अपघातात दोन जण जखमी झाले. अपघातानंतर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. सुदैवाने अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाचे जवानांनी वेळेत अपघातस्थळी पोहोचून स्थिती नियंत्रणात आणली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT