Pune Katraj Lake Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: कात्रज तलावाच्या कठड्यावरून खाली पडला, ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Katraj Lake: पुण्यातील कात्रज तलाव परिसरात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही व्यक्ती तलावाच्या कठड्यावरून खाली पडली आणि जखमी झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

Priya More
  • कात्रज तलावाजवळ कठड्यावरून पडून व्यक्तीचा मृत्यू

  • पुणे कात्रज तलाव परिसरात एकच खळबळ

  • या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत

अक्षय बडवे, पुणे

पुण्यातील कात्रज तलाव परिसरात कठड्यावरून पडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. कात्रज तलावालगत असलेल्या कठड्यावर ही व्यक्ती बसली होती. त्यावेळी ही व्यक्ती अचानक खाली कोसळली. या घटनेत ४५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. संबंधित व्यक्ती दारूच्या नशेत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. या घटनेनंतर कात्रज तलाव परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज दुपारी पुण्यातील कात्रज भागात घडली. कात्रजमध्ये असलेल्या तलाव परिसरातील सुरक्षा रक्षकाला तलावाच्या शेजारील मोकळ्या जागेत एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडलेली आढळून आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याने पोलिसांना कळवले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

संबंधित व्यक्ती खोल दरीत पडल्याने तातडीने अग्निशामक दल आणि रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून व्यक्तीला वर काढले. डॉक्टरांनी तपासणी केली असता संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर मृतदेह पुढील वैद्यकीय कार्यवाहीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या व्यक्तीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृत्यूचे नेमकं कारण समोर येईल. पण या घटनेमुळे काहीकाळ परिसरात खळबळ उडाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : हिवाळ्यात कोणतीही लक्षणे नसतानाही रक्तदाब का वाढतो? तज्ज्ञांनी सांगितली ही कारणे

तोंडलीची रस्सा भाजी कशी बनवायची? सोपी आहे पद्धत

December Bank Holiday List : डिसेंबरमध्ये बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या! RBI ने जाहीर केली यादी

Maharashtra News Live Update: धुळ्यात शेतकऱ्याचे कापूस विक्रीचे पैसे लुटल्याप्रकरणी दोघांना अटक

Shirdi Vande Bharat : रेल्वेचा मोठा निर्णय! महाराष्ट्रातली पहिली वंदे भारत एक्स्प्रेस 'या' स्थानकावरही थांबणार, कोणाला होणार फायदा?

SCROLL FOR NEXT