Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 2 महिन्यातच खड्डे; व्हिडीओ समोर आल्याने एकच खळबळ

Missing Link Project: मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पावरील केबल स्टेड ब्रिजजवळ पहिल्याच मुसळधार पावसानंतर खड्डे पडल्याची घटना समोर आली आहे.
Mumbai Pune Missing Link
Mumbai Pune Missing Linksaam tv
Published On

मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरील केबल स्टेड ब्रिजजवळील रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे हे खड्डे पुलावरील एक्स्पान्शन जॉइंटच्या जवळ तयार झाले आहेत. अवघ्या काही आठवड्यांपूर्वी सुरू झालेल्या या मार्गावर इतक्या लवकर खड्डे पडल्याने नागरिकांनी कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

पहिल्याच पावसात जर अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर या मार्गावर ताशी मोठ्या वेगाने धावणाऱ्या वाहनांचा प्रवास किती सुरक्षित आहे, असा प्रश्न आता गाडी चालक आणि नागरिकांकडून विचारला जात आहे.

Mumbai Pune Missing Link
School Reopen: शाळा सुरू होण्याची तारीख २४ तासांत पुन्हा बदलली! आता 'या' दिवशी भरणार वर्ग; कोर्टाचा आदेश

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

हे प्रकरण तेव्हा समोर आलं ज्यावेळी या खड्ड्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवर शेअर केला. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर नव्याने उभारण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या टिकाऊपणा आणि दर्जाबाबत अनेक शंका उपस्थित होऊ लागल्या.

Mumbai Pune Missing Link
School Holiday: सर्व शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर, KDMC चा मोठा निर्णय

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात एमएसआरडीसीने या घटनेची पुष्टी केली आहे. एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मिसिंग लिंकच्या एका मार्गिकेवर दोन खड्डे पडले होते. हे खड्डे केबल स्टेड पुलावरील एक्स्पान्शन जॉइंटजवळ तयार झाले होते. ही बाब लक्षात येताच संबंधित कंत्राटदार आणि एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना तातडीने दुरुस्तीचे आदेश देण्यात आलेत. त्यानंतर प्राधान्याने दुरुस्तीचं काम पूर्ण करण्यात आल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील १३.३ किलोमीटर लांबीचा हा मिसिंग लिंक प्रकल्प भोर घाटातील वाहतूक टाळण्यासाठी उभारण्यात आलाय. या प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे प्रवासाचा वेळ सुमारे २५ ते ३० मिनिटांनी कमी होणार असल्याचं सांगितलं जातंय. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही उपस्थित होत्या.

Mumbai Pune Missing Link
School Closed: मुसळधार पावसाचा कहर! मुंबई ठाण्यासह 'या' ठिकाणी आज शाळांना सुट्टी, प्रशासनाचे आदेश

मात्र, उद्घाटनानंतर अवघ्या दोन महिन्यांतच पहिल्या पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडल्याने या प्रकल्पाच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारलेल्या या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त केली जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com