पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरून पडून एक तरुण बेपत्ता झाला. सिंहगड किल्ल्याच्या तानाजी कड्यावरून खोल दरीत हा तरुण पडला. हैदराबादवरून आपल्या मित्रांसोबत पुणे फिरण्यासाठी आले असता ही घटना घडली. घटनेची माहिीत मिळताच आपत्ती व्यवस्थापन, स्थानिक ग्रामस्थ पोलिस यांच्या मदतीने रात्रभर शोधकार्य केले मात्र हा तरुण सापडलेला नाही. आज सकाळपासून पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. गौतम गायकवाड (वय २४ वर्षे) असं बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. या गौतमच्या मित्रांनी त्याच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, गौतम गायकवाड हा तरुण हैदराबाद येथून ५ मित्रांसोबत पुणे येथे फिरण्यासाठी आला होता. बुधवारी दुपारी ४:३० वाजता हे सर्वजण सिंहगडावर आले होते. या वेळेस सायंकाळच्या सुमारास तानाजी कड्याजवळ ते आले असता गौतमने लघवीला जाऊन येतो असे मित्रांना सांगितले. मात्र बऱ्याच वेळानंतरही तो परत आला नाही म्हणून मित्रांनी गौतमचा शोध घेतला असता तो सापडला नाही.
सिंहगड किल्ल्याच्या तानाजी कडा येथे हवा पॉइंटजवळ गौतमची चप्पल आढळून आली. त्यामुळे पाय घसरून तो खोल दरीत कोसळला असल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या मित्रानी तानाजी कडा येथे त्याचा शोध घेतला पण तो साडला नाही. सिंहगड भागात मुसळधार पाऊस असून वाऱ्याचा वेगही जास्त आहे. वाऱ्याचा आणि जमिनीचा अंदाज न आल्याने गौतम खोल दरीत कोसळला.
या घटनेची माहिती स्थानिक गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन आणि ग्रामीण पोलिस कर्मचारी आणि स्थानिक गिर्यारोहकांनी घटनास्थळी धाव घेतली. या सर्वांनी रात्री उशिरापर्यंत गौतमचा शोध घेतला पण तो सापडला नाही. आज सकाळपासून पुन्हा शोध मोहिम राबवण्यात आली. ही दरी जवळपास १ हजार फुटांपर्यंत खोल असून त्यामध्ये उतरून आपत्ती व्यवस्थापन पथक या तरुणाचा शोध घेत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.