Pune Accident  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: पतंग खेळायला गेले असता भयंकर घडलं, पुण्यात रेल्वेच्या धडकेत ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Pune Train Accident: पुण्यामध्ये ट्रेनच्या धडकेत ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना हडपसरजवळ घडली. पंतग उडवण्यासाठी गेले असता ही घटना घडली. रेल्वे रूळावर या मुलाचा मृतदेह आढळून आला.

Priya More

Summary:

  • पुण्यात ट्रेनच्या धडकेत ११ वर्षीय मुलाचा मृत्यू

  • पंतग उडवण्यासाठी गेले असता घडली घटना

  • हडपसर येथे रेल्वे मार्गावर त्याचा मृतदेह आढळून आला

सचिन जाधव, पुणे

पुण्यामध्ये रेल्वेच्या धडकेमध्ये ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. पंतग खेळायला गेले असता मुलाची दुर्दैवी मृत्यू झाला. पुण्यातील हडपसर परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली. पुणे-सातारा रेल्वे रूळावर अचानक आलेल्या ट्रेनने या मुलाला धडक दिली. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पतंग खेळायला गेलेल्या विद्यार्थ्याचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. पतंग खेळायला घराबाहेर पडला पण तो परत घरीच आला नाही. गुरूवारी सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह ससाणेनगर येथील पुणे-सातारा रेल्वे रूळाच्या भुयारी मार्ग परिसरातील रेल्वे मार्गावर आढळून आला.

प्रकाश डबले भुल (वय ११ वर्षे, गीतगंधर्व सोसायटी, ससाणेनगर, हडपसर पुणे, मूळ रा. नेपाळ) असे मृत मुलाचे नाव होते. बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास प्रकाश राहते घरातून पतंग खेळण्यासाठी गेला होता. तो घरी आला नसल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सापडला नाही. त्यानंतर त्याच्या वडिलांनी काळेपडळ पोलिस ठाण्यात धाव घेत मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

पोलिसांनीही प्रकाश भुल बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून घेत त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सापडला नाही. तर गुरूवारी सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास ट्रॅकमनला प्रकाशचा मृतदेह रेल्वे रूळावर आढळून आला. त्यानंतर ट्रॅकमॅनने काळेपडळ पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणाचा अधिक तपास काळेपडळ पोलिस करत आहेत. प्रकाशच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: अपात्र लाडक्या बहि‍णींवर २१ हजार कोटींचा खर्च; २० महिन्यापासून ₹१५०० घेतले

Fridge Cleaning Tips: उन्हाळ्यात फ्रिजमधून दुर्गंधी येतेय? स्वयंपाकघरातील या गोष्टींनी करा स्वच्छ

Lack of sleep health risks: फक्त थकवा नाही! वाचा अपुरी झोप तुमच्या मेंदूची ताकद कशी कमी करते

Bridal Makeup Tips: लग्नासाठी परफेक्ट ब्राइडल मेकअप हवा आहे? मग या साध्या मेकअप टिप्स नक्की करा फॉलो

Pune Crime: दुहेरी हत्याकांडाने आळंदी हादरली, वृद्ध महिलेसह ६ वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT