Barabanki Accident
Burnt vehicles after a deadly collision on the Purvanchal Expressway in Barabanki, Uttar Pradesh.Saam tv

Car Accident: भरधाव कारची उभ्या असलेल्या वॅगनआर कारला धडक, टक्कर होताच दोन्ही वाहनांनी घेतला पेट, ५ जणांचा मृत्यू

Barabanki Accident : उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील पूर्वांचल एक्सप्रेसवेवर झालेल्या एका भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झालाय. एका भरधाव कारने उभ्या वॅगनआर करला धडक दिली. टक्कर होताच दोन्ही वाहनांना आग लागली.
Published on
Summary
  • पूर्वांचल एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झालाय.

  • भरधाव कारने उभ्या एका दुसऱ्या एका कारला धडक दिली.

  • अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू

उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे पूर्वांचल एक्सप्रेसवेवर सकाळच्या सुमारास दोन चारचाकी कार अपघात झाला. यात ५ जणांचा मृत्यू झालाय. पूर्वांचल एक्सप्रेसवेवरील कुडवा गावाजवळ हा अपघात घडला. नियंत्रण सुटल्यानंतर एका कारने समोर उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिली. त्यानंतर दोन्ही पेट घेतला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झालाय. दोन्ही कारमधील काही लोक जखमी झाले असून यातील एका मुलीची प्रकृती गंभीर आहे.

कुडवा गावाजवळ भरधाव ब्रेझा कारने उभ्या असलेल्या वॅगनआर कारला धडक दिली. धडक होताच दोन्ही गाड्यांनी पेट घेतला. ब्रेझा कारमध्ये तीन महिला आणि एक मुलगी होती. यांपैकी मुलीची प्रकृती गंभीर आहे. तर वॅगनआर कारमध्ये तीन मुली, एक महिला आणि एक पुरुष स्वार होते. या अपघातात एक महिला आणि एका मुलीचा जागीच मृत्यू झाला.

Barabanki Accident
Accident : आयटीआयसमोर भीषण अपघात, स्पीड ब्रेकरवर वाहन आदळलं अन् दोन तरुणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील पूर्वांचल एक्सप्रेसवेवर हा अपघात झाला. ब्रेझा कार नियंत्रणाबाहेर गेली होती. ही अनियंत्रित झालेली कार समोर उभ्या असलेल्या कारला धडकली. टक्कर होताच वाहनांनी पेट घेतला. वाहनाची धडक झाल्याचा आवाज आल्यानंतर रस्त्याच्या शेजारील शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने कारमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

Barabanki Accident
Maharashtra Live News Update: कोल्हापुरात ट्रकचा विचित्र अपघात, चार वाहनांचे मोठं नुकसान

त्यानंतर त्यांनी पोलिसांनाही अपघाताची माहिती दिली. यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुडवा गावाजवळ हा भीषण अपघात झाला. एका प्रत्यक्षदर्शी माध्यमांना अपघाताची माहिती देताना सांगितले की, “आम्ही शेतात काम करत होतो, अचानक भरधाव असलेल्या एका कारने दुसऱ्या कारला जोरात धडक दिली. यानंतर दोन्ही कारने पेट घेतला. आम्ही पळत जाऊन लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान हैदरगड येथील सरकारी आरोग्य केंद्रात पाच जणांना मृत घोषित करण्यात आले. यातील जखमींना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. यांपैकी एकाची स्थिती अधिक गंभीर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com