
सांगलीच्या पलूस तालुक्यातल्या आमणापूर येथील कृष्णाकाठावर सध्या छोटा आर्ली पक्षांची शाळा भरली आहे.कोंडार परिसरातील कृष्णा नदीच्या काठावर छोटा आर्ली पक्षांचा मुक्काम पाहायला मिळत आहे.तलाव,नदीकाठी आढळणारा करड्या रंगाचा छोटा आर्ली हा पक्षी प्रॅंटिकोल वर्गातील ग्लेरिओलिडे कुळातील पक्षी आहे.
हे पक्षी प्रामुख्याने भारतासह,नेपाळ, पूर्व पाकिस्तान आणि श्रीलंका या प्रदेशात आढळतात.त्यांचा निवास नद्या आणि दलदलीचे प्रदेश या ठिकाणी असतो, चिमणीएवढ्या आकाराचे पाकोळीसारखे टोकदार पंख आणि बाणाच्या आकाराची शेपटी असा या पक्षांची ओळख आहे.सध्या हा छोटा आर्ली कृष्णाकाठावर स्थिरावला असून तब्बल 53 छोटा आर्ली पक्षांची नोंद झाली आहे.
छत्रपती संभाजीनगरात लग्नसमारंभाच्या कार्यक्रमात एका चोरट्याने पैसे आणि मोबाईल असलेली पर्स लंपास केल्याची घटना समोर आली आहे. सुतगिरणी चौक परिसरातील जानकी बँक्वेट हॉलमध्ये सुरू असलेल्या लग्नसोहळ्यात एका चोरट्याने अत्यंत शिताफीने ही चोरी केली असून, हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी हर्ष रविंद्र भावसार यांनी तक्रार दिली असून त्यांच्या आईची पर्स अज्ञात चोरट्याने हॉलमध्ये प्रवेश करून चोरून नेली. या पर्समध्ये दोन मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण १७ हजारांचा मुद्देमाल होता. घटनेनंतर जवाहर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरू केला आहे.
पत्नी पतीला नेहमी अपमानास्पद वागणूक देत असल्याने रागाच्या भरात पतीने पत्नीचा कुऱ्हाडीने खून केल्याची घटना जळगाव जामोद तालुक्यातील उटी बुद्रुक येथे मध्यरात्री घडली... याप्रकरणी आरोपी पवन गजानन धुंडाळे वय 28 वर्ष याच्याविरुद्ध जळगाव जामोद पोलीसात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे....
विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील चिंचोली गावात राजेश रामकृष्ण इंगळे या 55 वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली.
एकीकडे अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होणार, तर दुसरीकडे शेतकरी रोज हतबल होत जीव देत आहेत. पीकनुकसान, कर्जबाजारीपणा, अपुरी मदत आणि सरकारी दुर्लक्ष यामुळे शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे...या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून सरकारने तातडीने कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, तसेच कर्जमाफी आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी केली जात आहे...
किनगाव जट्टू ते भुमराळा या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असून नेहमी अपघात होतात, खड्ड्यात रस्ता, की रस्त्यात खड्डे हे कळायलाच मार्ग नाही.. रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले असून असंख्य नागरिकांना अपंगत्व आले आहे , तसेच विदर्भ मराठवाडा ला जोडणारा हा मुख्य मार्ग असल्याने या रस्ताची दयनीय अवस्था झाली आहे, निधी अभावी ठेकेदाराने काम करण्यास मनाई केली आहे.. दीड वर्षांपासून रस्त्याचे काम रखडले आहे आज भाजपाच्या वतीने रस्त्यावरील खड्ड्याचे पूजन करण्यात आले व गणपती आरती घेण्यात आली असे अनोखे आंदोलन करून शास्नाचे लक्ष वेधण्यात आले.. जर आठ दिवसात कामाला सूरवात झाली नाही तर जिल्हा कचेरीवर उग्र आंदोलन करू असा इशारा भाजपचे नेते देवानंद सानप यांनी दिला आहे..
नाशिकच्या ग्रामीण भागात तापमानाचा पारा घसरला असून मालेगाव चे तापमान अकरा अंशावर असतांना पारा आणखी खाली घसरला असून तो ९ अंशावर आल्याने नागरीकांना चांगलीच हुडहुडी भरल्याने पुन्हा एकदा शेकोट्या पेटवत थंडी पासून बचावाचा प्रयत्न करत असल्याच पहावयास मिळत आहे.
हवामान खात्याने थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. यंदाच्या हंगामातील यवतमाळ जिल्ह्याचा सर्वाधिक कमी तापमानाची नोंद करण्यात आली असून पारा 8.8 अंशावर स्थिरावला. तर दुसरीकडे दिवसाचे तापमान वाढत असल्याचेही विरोधाभासी चित्र निर्माण झाली आहे 29 अंशावरून तापमान 30 वर पोहोचले आहे.1.2 अंश इतकी वाढ दिवसाच्या तापमानात झाली आहे.
विदर्भासह मराठवाड्यात गारठा कायम, पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा किमान तापमानात घट
मराठवाड्यात पारा १० अंशाच्या जवळ
उत्तरेकडून गोठविणारी थंडी महाराष्ट्रावर धडकत असल्याने अनेक जिल्ह्यात किमान तापमानात घट
राज्यातील कुठल्या जिल्ह्यात किती तापमान (किमान तापमान)
अहिल्यानगर: ९.५
नाशिक: १०.३
यवतमाळ: ८.८
जळगाव: ९.४
मालेगाव: ९.०
गोंदिया: ९.०
पुणे: ११.३
नागपूर: ९.६
अमरावती: ९.६
महाबळेश्वर: १४.३
सातारा: १३.६
सांगली: १५.३
सोलापूर: १५.४
छत्रपती संभाजीनगर: १०.०
परभणी: १०.६
नांदेड: ९.६
बीड: १०.५
अकोला: १०.६
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २१ डिसेंबर रोजी नियोजित असलेली ‘महाराष्ट्र गट ‘ब’ (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा’ पुढे
आता ही परीक्षा ४ जानेवारी २०२६ रोजी घेण्यात येणार
राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदानाची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार आहे
याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ‘महाराष्ट्र गट ‘ब’ (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा’ही आयोजित करण्यात आली होती
पुण्यातील कोरेगाव पार्क येथे महापालिकेचे काम सुरू असताना दुर्दैवी घटना
राहुल अनिल गोसावी (वय ३८) असे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्याचे नाव
सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली
राहुल हा महापालिकेच्या कोरेगाव पार्कमधील कचरा डेपोतील वाहन विभागात चालक म्हणून कार्यरत होता. काल दुपारी एकच्या वाजता दुसऱ्या चालकाने जेसीबी सुरू केला. त्यावेळी राहुल गोसावी तेथे उभा होता. जेसीबीचे लोखंडी फाळके अचानक खाली येऊन गोसावी यांच्या डोक्यात पडले. त्यात गंभीर जखमी झाल्याने गोसावी यांचा मृत्यू झाला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये अटक केलेली महिला तोतया आयएएस अधिकारी आणि अन्य एजंटांनी मिळून अनेकांना देशाचे सर्वोच्च, नामांकित पुरस्कार मिळवून देण्याचे आमिष दाखवण्याचे दाखवून फसवणूक केल्याचं तपासात समोर आलंय. यात शहरातील एका स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्याने राज्यपालांपासून ते कॅबिनेट मंत्री, आयएएस अधिकारी, पोलिस अधिकाऱ्यांकडून मिळालेले सन्मानपत्र, शिफारसपत्र तयार केले. या रॅकेटच्या संपर्कात आलेल्या अनेकांचा देशातील नामांकित पुरस्कारासाठी ५० ते ६० सन्मानपत्र, शिफारसपत्रांच्या फाईलसह प्रस्ताव तयार होता. पोलिसांनी यातील रमेश नामक व्यक्तीला चौकशीसाठी नोटीस दिल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ता सांगणाऱ्या रमेश यांच्या नावे तब्बल ३० सन्मानपत्र, तर देशाच्या सर्वोच्च पुरस्कारासाठी १४ राज्यांतील विधानसभेचे उच्चपदस्थ अधिकारी, कॅबिनेट मंत्री, नामांकित कीर्तनकार, राजघराण्यातील व्यक्ती, आमदार, आयएएस, पोलिस अधिकारी, नामांकित रुग्णालयाचे अध्यक्षांचे सन्मानपत्र, शिफारसपत्राची फाईल समोर आली आहे. हे सर्व पत्र त्यांनी अर्जासोबत जोडले होते
गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांविरोधात महसूल विभाग आणि पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे.नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील खुजडा गावाच्या परिसरात गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती.मुदखेड महसूल विभाग आणि मुदखेड पोलिसांनी माहितीच्या आधारावर गोदावरी नदी पात्रातून होत असलेल्या अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर धाड टाकली.अवैध वाळू उपसा करणाऱ्या चार बोटी जिलेटिनच्या साह्याने स्फोट घडून नष्ट केल्या.
उत्तरेकडील शीत लहरींचे पुन्हा महाराष्ट्रात आगमन झाल्याने राज्यात थंडीची तीव्र लाट येण्याची चिन्हे आहेत. धुळे येथील कृषी महाविद्यालयात पारा ५.४ अंशांवर आल्याने हंगामातील नीचांकी तापमान नोंदले गेले आहे. आज (ता. ९) विदर्भासह राज्यात तुरळक ठिकाणी थंडीच्या लाटेची शक्यता आहे. तर उद्यापासून (ता. १०) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
- भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची निलंबनाची केली मागणी...
- विधानसभा अधिवेशनात लावणार लक्षवेधी सूचना...
- अज्ञात व्यक्तीकडून आज विधानभवन परिसरात असतांना भाजप आमदार कृष्णा खोपडे यांना धमकीचे फो
- दहा ते पंधरा फोन सातत्याने केले, तुम्ही तुकाराम मुंडेच्या विरोधात तक्रार करू नका अश्या धमक्यांना दिल्या आहे,
- या सगळ्या संदर्भात पोलिसात तक्रार करणार असल्याच भाजप आमदर कृष्णां खोपडे यांनी साम tv सोबत बोलतांना सांगितलं..
शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे जितेंद्र गायकवाड यांच्या घरासमोर ओट्यावर बसलेल्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने मध्यरात्री हल्ला चढवला.अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने कुत्र्यावर झडप घालत त्याला उचलून नेलं.हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला असून,घटनेनंतर परिसरात बिबट्याच्या वाढत्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.