Pune Shivajinagar road closure traffic update  Saam TV Marathi News
मुंबई/पुणे

Pune : पुण्यात वाहनांच्या ४ किमीपर्यंत रांगा, बसची मेट्रो खांबाला धडक, शिवाजीनगरकडे जाणारा रस्ता बंद

Pune Traffic Update News : पुण्यात ई-स्क्वेअर चित्रपटगृहाजवळ लग्जरी बस मेट्रोच्या खांबाला धडकल्याने शिवाजीनगरकडे जाणारा रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. या अपघातामुळे ३ ते ४ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या .

Akshay Badve

Pune Shivajinagar road closure traffic update : पुण्यात आधीच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. त्यातच सोमवारी ऑफिस, कॉलेजला निघालेल्या पुणेकरांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागलाय. स्क्वेअर चित्रपटगृहाजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पहाटे घडलेला अपघात याला कारण ठरलेय. होय, पहाटे लग्जरी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. त्यामुळे वाहतूक पोलिसांकून शिवाजीनगरकडे जाणारा रस्ता बंद ठेवला. याचा परिणाम वाहतूक कोंडीवर झालाय. जवळपास ४ किमीच्या रांगा लागल्या आहेत.

पुण्यातील ई स्क्वेअर चित्रपटगृहाजवळ आज सकाळी लग्जरी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. त्यामुळे शिवाजीनगरकडे जाणारा रस्ता पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केला आहे. पुण्याच्या दिशेने जाणापी खासगी बस थेट मेट्रोच्या खांबावर धडकली आणि पाठीमागून येणाऱ्या ट्रकने तिला धडक दिली. त्यामुळे मोठं नुकसान याठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे.त्यामुळे शिवाजीनगरच्या दिशेने जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातील या रस्त्यावर एकच लेन खुली आहे तसेच दुसऱ्या बाजूला, औंध बाणेर दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर सुद्धा ३ ते ४ किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

पुण्यातील ई-स्क्वेअर चित्रपटगृहाजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. जवळपास चार किमीच्या रांगा लागल्या आहेत. रात्री झालेल्या अपघातामुळे या ठिकाणची एक लेन बंद ठेवण्यात आली असल्याची पोलिसांनी सांगितले. आज सोमवार आणि सकाळच्या सत्रात ऑफिस महाविद्यालयांना जाणाऱ्या नागरिकांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागतोय. औंध पिंपरी चिंचवड कडून येणाऱ्या नागरिकांनी खडकी अंडरपास द्वारे शिवाजीनगर च्या दिशेने प्रवास करावा. बाणेर कडून शिवाजीनगर कडे जाणाऱ्या नागरिकांनी एबीला ऊस येथून डावीकडे वळून घेऊन रेंजल मार्गे पुढे जावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

नवले पुलावर पुन्हा अपघात ?

पुण्यातील नवले पूलजवळील अपघाताचे सत्र काही केल्या थांबत नाही. या परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघात झालाय. आज पहाटे ४ वाजता स्वामीनारायण मंदिराच्या जवळ अपघाताची घटना घडली. ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

कात्रज येथील बोगद्यातून बाहेर आल्यावर अचानक ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडला, असे तपासून समोर आले आहे. सुदैवाने यात इतर कुठल्याही वाहनांना धडक बसलेली नाही मात्र ट्रकचं मोठे नुकसान झालं आहे. या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या अपघातीच नोंद केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

Tuesday Horoscope : खर्चाला गळतीच राहील; ५ राशींच्या लोकांना चोरीपासून सावध राहावे लागेल

SCROLL FOR NEXT