Pune Traffic police Suspended Saam
मुंबई/पुणे

Pune Traffic: नेमून दिलं तिथे गेलेच नाही, दुसऱ्या चौकात जाऊन वसुली; पुण्यात ३ वाहतूक पोलीस सस्पेंड

Pune Traffic Police Suspended: पुण्यात वाहतूक पोलिसांनी आपल्या मुख्य जबाबदारीकडे दुर्लक्ष करून केवळ दंड वसुलीवर भर दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

Bhagyashree Kamble

सचिन जाधव, साम टीव्ही

ज्या चौकात ड्युटी लावली त्या चौकात न जाता दुसऱ्या चौकात केवळ दंड वसुलीवर भर दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या गंभीर बाबीची दखल घेत पुणे वाहतूक विभागाने तातडीने कारवाई करत तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली आहे. वाहतूक कोंडी न सोडवता वाहनावर दंड आकारत असल्याचं आढळून आल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या घटनेनंतर पुण्यात खळबळ उडाली आहे.

संतोष चंद्रकांत यादव ,बालाजी विठ्ठल पवार आणि महिला पोलीस शिपाई मोनिका प्रवीण करंजकर असे वाहतूक विभागातील निलंबित पोलिसांची नावे आहेत. संतोष चंद्रकांत यादव यांची ड्युटी एस पी चौक या ठिकाणी होती. तर, बालाजी विठ्ठल पवार यांची हिराबाग चौक, तर मोनिका करंजकर यांची ड्युटी भावे चौकात होती.

मात्र, त्यांनी आपापली नेमणुकीची ठिकाणं सोडून पुरम चौकातील गाड्यांना अडवून दंड आकारत असल्याची माहिती समोर आली. याची माहिती समोर आल्यानंतर वाहतूक विभागाने तातडीने कारवाई करत तीन पोलिसांना निलंबित केलं.

दररोज शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी जाणवते. अशा परिस्थितीत वाहतूक नियमनाऐवजी दंड आकारण्यावर भर देणं गंभीर बाब मानली जात आहे. त्यामुळेच वाहतूक विभागाने तात्काळ कारवाई करत या तिघांना निलंबित केलं आहे. या घटनेनंतर पुण्यात पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. नागरिकांमध्येही संतापाची भावना व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांकडून पुणे जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

विहिरीत बुडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू,अंदाज चुकला अन् विपरित घडलं!

पालघर पाण्यात, मृतदेह छतावर, मृत्यूनंतरही नरकयातना थांबेनात

Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेत २३ लोकांपैकी १४ जणांची सुटका तर ८ लोकांचा मृत्यू

सिद्धिविनायकची दानपेटी कुणी लुटली? शिंदेंचा बांदेकरांवर आरोप, ठाकरेंवर निशाणा

SCROLL FOR NEXT