Pune Traffic Police Video Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: पुण्यात भररस्त्यात ट्रॅफिक पोलिस आणि कॅब चालकाचा राडा, शिवीगाळ करत मारहाण; VIDEO व्हायरल

Pune Traffic Police: पुणामध्ये ट्रॅफिक पोलिस आणि कॅब चालकामध्ये वाद झाला. या वादादरम्यान आधी शिवीगाळ नंतर मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुण्यामध्ये ट्रॅफिक पोलिस आणि कॅब चालकांनी भररस्त्यात राडा केल्याची घटना समोर आली आहे. ट्रॅफिक पोलिसाने आपल्या कारला कट मारून गेल्याच्या रागातून कॅब चालकाने त्यांना जाब विचारत शिवीगाळ केली. यानंतर संतप्त झालेल्या ट्रॅफिक पोलिसाने या कॅब चालकाला मारहाण केली. या कॅब चालकाने ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील रेल्वे स्टेशन समोरील रस्त्यावर आज सकाळी कॅब आणि एका वाहनाचा किरकोळ अपघात झाला. त्यामुळे कॅब चालकाने कार रस्त्याच्या कडेला उभी करून ते दोघे भांडत होते. त्याच वेळी त्याठिकाणी ट्रॅफिक पोलिस आपल्या कारमधून आले. त्यांनी या कॅब चालकाला 'तू ट्रॅफिक अडवून लोकांना त्रास देत आहे', असं सांगितलं. त्यावरून कॅब चालक आणि ट्रॅफिक पोलिस यांच्यात वाद सुरू झाला.

संबंधित ट्रॅफिक पोलिस आणि कॅब चालक यांच्यामध्ये जोरदार भांडण सुरू झाले. जाब विचारत असलेल्या ट्रॅफिक पोलिसाने कॅबला कट मारून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कॅब चालकाने ट्रॅफिक पोलिसाला शिवी दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या ट्रॅफिक पोलिसाने आपली कार रस्त्यात थांबवून कॅब चालकाला मारहाण केली. कॅब चालाकाने या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. ट्रॅफिक पोलिस आणि कॅब चालकाचा हा वाद सध्या पुण्यात चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील विविध भागात अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरूच

Ladki Bahin Yojana: १ लाख ४ हजार लाडक्या बहिणींचे अर्ज बाद; मिळणार नाही १५०० रुपये; यादीत तुमचं नाव आहे का?

independence day 2025 : 'मांस विक्रीचे फतवे नंपुसक करायचे'; मांसाहार बंदीवरून महायुतीत मतभेद,VIDEO

Thursday Horoscope : तुमचा साधेभोळेपणा इतरांना भावणार; ५ राशींच्या लोकांना अचानक धनलाभ होणार, वाचा गुरुवारचं राशीभविष्य

Dhananjay Munde : मुंबईत कोट्यवधींचं घर; मुंडे मात्र 'सातपुडा'वर, कारण काय? VIDEO

SCROLL FOR NEXT