Pune Parking Fine
Pune Parking Fine Saamv
मुंबई/पुणे

Pune News: पुणेकरांनो सावधान! नो पार्किंगमध्ये वाहन लावाल तर खिसा होईल रिकामा; किती होणार दंड?

Gangappa Pujari

अक्षय बडवे, प्रतिनिधी....

Pune No Parking Issue: पुण्यात गाडी चालवणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. वाहनचालकांकडून दंडाची रक्कम आकारताना वाहनचालक आणि पोलिस यांच्यात अनेकदा वाद होतात. या पार्श्वभूमीवर मोटार व्हेइकल ॲक्टनुसार शहर वाहतूक शाखेने दंडाच्या रकमेबाबत सूचनापत्र जारी केले आहे. ज्यामध्ये नो पार्किंगच्या दंडामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वाहतूक कोंडीच्या समस्येने पुणेकर (Pune) गेल्या काही महिन्यांपासून हैराण झालेले आहेत. मात्र या कोंडीला फक्त प्रशासनच नाही तर सामान्य नागरिकसुद्धा जबाबदार आहे. नो पार्किंग मध्ये गाडी लावून आपली आपली काम करणे तसेच वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे हे चित्र पुण्यातील अनेक भागात पाहायला मिळते.

यानंतर पोलिसांनी जर कारवाई केली तर हेच नागरिक पोलिसांवर धावून जातात. यावरच तोडगा म्हणून आता वाहतूक विभागाकडून नो पार्किंग मध्ये उभारण्यात आलेल्या गाड्यांवर कारवाई केले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. (Latest Marathi News)

नवीन दर....

दुचाकी कारवाई (पहिली वेळ)

टॉइंग चार्ज: २०० रुपये

नो पार्किंग चार्ज: ५०० रुपये

जी एस टी, सी जी एस टी

एकूण दंडाची रक्कम: ७८५ रुपये...

चारचाकी कारवाई (पहिली वेळ)

टॉइंग चार्ज: ४०० रुपये

नो पार्किंग चार्ज: ५०० रुपये

जी एस टी, सी जी एस टी

एकूण दंडाची रक्कम: १०७१ रुपये

ही झाली पहिली वेळ आणि दुसऱ्यांदा जर तुम्ही तुमची वाहन नो पार्किंगमध्ये लावत असाल तर दुचाकीस १७८५ रुपये तर चारचाकीसाठी २०७१ रुपये इतका दंड बसू शकतो. त्यामुळे नो पार्किंगमध्ये वाहन लावताना एकदा विचार करा. कारण आता नो पार्किंगमध्ये वाहने लावणाऱ्यांना चांगलाच भुर्दंड सोसावा लागणार आहे. (No Parking Fine In Pune)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ankita Lokhande: हृदयस्पर्शी कॅप्शनसह अंकिता लोखंडेने पतीसोबतचा रुग्णालयातील फोटो केला शेअर

Maharashatra Elction: कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई; उद्धव आणि राज ठाकरेंच्या सभांचा झंजावात

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

Poco X6 5G नविन अवतारात लॉन्च झाला, मिळणार जबरदस्त फीचर्स

Farmers Protest: पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, 3 दिवस 46 गाड्या रद्द; 100 मार्ग बदलले

SCROLL FOR NEXT