Pune Traffic Changes news Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Traffic changes : पुण्यात वाहतुकीत मोठा बदल, काही रस्ते बंद, काही मार्गात बदल

Pune Traffic changes Update : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पुण्यात होणारी गर्दी पाहून पुण्यामध्ये वाहतुकीत बदल करण्यात आलाय. काही ठिकाणाची वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुणे पोलिसांची वाहनचालकांवर करडी नजर असेल.

Namdeo Kumbhar

Traffic changes in place for New Year’s Eve : सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पुणेकर मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडतात, त्यामुळे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे पुण्यात काही परिसरात वाहतुकीत मोठा बदल करण्यात आलाय. कॅम्प परिसरातील महात्मा गांधी रस्ता, तसेच फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्त्यावर होणारी गर्दी पाहाता वाहतुकीत बदल करण्यात आलाय.

३१ डिसेंबर रोजी सायंकाळी पाचनंतर कॅम्प आणि डेक्कन जिमखाना भागात वाहतूक बदल करण्यात आलाय. काही ठिकाणी No Vehicle Zones आणि ड्रंक अन् ड्राईव्हची तपासणी करण्यात येणार आहे. पुणे पोलिसांनी नागरिकांवर करडी नजर असेल. ३१ डिसेंबर, सायंकाळी पाच वाजल्यानंतर वाहतूक निर्बंध सुरू होईल. लोकांची गर्दी कमी होईपर्यंत हे निर्बंध कायम राहतील. फर्ग्युसन कॉलेज रोड आणि महात्मा गांधी रोड हे ‘नो व्हेईकल झोन’ असतील.

पुणे वाहतुकीत काय बदल झाला? Traffic Diversions and Road Closures

फर्गुस कॉलेज रोड : गुड लक हॉटेल ते फर्गुसन कॉलेज मेन गेटपर्यंत वाहतूक बंद राहील.

महात्मा गांधी रोड : महात्मा गांधी रस्त्यावरील १५ ऑगस्ट चौक ते अरोरा टॉवर्स चौकदरम्यान वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. येथील वाहतूक खुरेशी मस्जीद आणि सुजाता मस्तानी चौकाकडे वळवण्यात आली.

इस्कॉन मंदिराकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता, तसेच अरोरा टॉवर्सकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

व्होल्गा चौकातून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक ईस्ट स्ट्रीटवरून इंदिरा गांधी चौकाकडे वळविण्यात आली आहे.

इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. ही वाहतूक लष्कर पोलीस ठाण्याकडे वळवण्यात आली.

सरबतवाला चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. ही वाहतूक ताबूत रस्त्यावर वळवण्यात आली.

डेक्कन भागातील वाहतुकीत बदल काय? Deccan Area Diversions

कोथरूडकडून फर्गुसन कॉलेजला जाणारी वाहतूक खंडुजीबाबा चौक येथे थांबविण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक विधी महाविद्यालय रस्ता, प्रभात रस्ता, अलका चित्रपटगृहाकडे वळविण्यात आली आहे.

जंगली महाराज रस्त्यावर होणारी गर्दी विचारात घेऊन झाशीची राणी चौकातून वाहतूक बंद करण्यात आली. या भागातील वाहतूक गोखले स्मारक चौक, पुणे महापालिका भवन, ओंकारेश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज रस्तामार्गे वळवण्यात आली.

फर्ग्युसन कॉलेज रोड आणि महात्मा गांधी रोडवर ३१ डिसेंबरला संध्याकाळी ५ ते १ जानेवारीला पहाटे ५ वाजेपर्यंत पार्किंगला बंदी असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई-पुणे रस्त्यावर भीषण अपघात; कंटेनरची २० वाहनांना धडक

Ind vs Eng : आधीच ३११ धावांची पिछाडी, त्यात शून्यावर साई-यशस्वी बाद, मँचेस्टरमध्ये टीम इंडियावर पराभवाचं सावट

Kiara Advani Skin Care: कियारा अडवाणीची ही स्किन केअर रूटीन करा फॉलो, तुमचीही त्वचा करेल ग्लो

पतीचं निधन, दुसऱ्या लग्नासाठी आईनं १० हजारांना मूल विकलं? नातवंडासाठी जीव तीळ तीळ तुटणाऱ्या आजीचा आरोप

Sansad Ratna Award 2025 : महाराष्ट्रातील ७ खासदारांनी दिल्लीत नाव गाजवलं; सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड यांच्यासह निशिकांत दुबेंनाही संसदरत्न पुरस्कार

SCROLL FOR NEXT