Pune Traffic  Saam Tv
मुंबई/पुणे

अक्षय्य तृतीयेनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल; 'हे' आहेत पर्यायी मार्ग

Pune traffic diversion Akshaya Tritiya Dagdusheth temple routes : अक्षय्य तृतीयेनिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात मोठी गर्दी होणार असल्याने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.

Namdeo Kumbhar

Pune Traffic News Update : अक्षय्य तृतीयेनिमित्त आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. मध्यभागातील श्री छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

"अक्षय्य तृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होते. तसेच भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त दुचाकी फेरी (रॅली) काढण्यात येणार आहे. ही गर्दी लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येत आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा," असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.

असे असतील बदल:

गर्दी ओसरेपर्यंत मध्यभागातील श्री छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता आणि परिसरातील रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता पीएमपी बस, तसेच अन्य वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात येतील. गर्दीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे.

असे असतील पर्यायी मार्ग:

स्वारगेटकडे जाणारी वाहतूक: छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरून स्वारगेटकडे जाणारी वाहतूक स. गो. बर्वे चौकातून (मॉडर्न कॅफे) जंगली महाराज रस्ता, झाशीची राणी चौक, डेक्कन जिमखाना, टिळक चौक आणि टिळक रस्ता मार्गे वळविण्यात येणार आहे.

पीएमपी बस मार्ग: महापालिका भवनाकडे जाणाऱ्या पीएमपी बस स. गो. बर्वे चौक, जंगली महाराज रस्ता आणि झाशीची राणी चौकामार्गे जातील.

बुधवार चौक मार्ग: आप्पा बळवंत चौकातून हुतात्मा चौकाकडे (बुधवार चौक) जाणारा मार्ग वाहतुकीस बंद राहील. या भागातील वाहतूक बाजीराव रस्त्याने वळविण्यात येईल.

गणेश रस्ता: लाल महाल चौकातून गणेश रस्त्याकडे जाणारी वाहतूकही पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तमिळनाडूचं राजकारण मोक्याच्या क्षणी फिरलं; थलपती विजय यांनी केलं मॅजिक, मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार?

Maharashtra News Live Update: रत्नागिरीत पाऊस, वादळी वा-यासह अवकाळी पावसाची हजेरी

Trendy Simple Mangalsutra: ऑफिस किंवा रोजच्या वापरासाठी ट्राय करा लाइटव्हेट आणि साधे ट्रेंडी मंगळसूत्र डिझाईन्स

TCS Case: घरात बुरखा आणि धार्मिक पुस्तके सापडणे कधीपासून अवैध झाले? असदुद्दीन ओवेसींकडून निदा खानचं समर्थन

Kitchen Hack : उन्हाळ्यात मडक्यात पाणी पिताय? थांबा त्यापूर्वी 'हे' आधी करा

SCROLL FOR NEXT