toxic liquor Saam tv
मुंबई/पुणे

पुणे हादरले! दारू प्यायल्यानंतर अचानक पोटदुखी आणि मळमळ, एकाच कुटुंबातील ४ जणांसह ५ जणांचा बळी; जबाबदार कोण?

Pune breaking news today : पुण्यातील हडपसर परिसरात विषारी दारूमुळे ५ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली असून अवैध दारू विक्रीवर संताप व्यक्त केला जात आहे.

Namdeo Kumbhar

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

5 dead after drinking toxic liquor in Pune : पुण्यातील हडपसर परिसरात केमिकल मिश्रित विषारी दारूने थैमान घातले आहे. पांढरे मळा भागात राहणाऱ्या तब्बल पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे सर्वजण स्थानिक दारूच्या अड्ड्यावर दारू पिण्यासाठी गेले होते. त्यानंतर त्यांना अचानक पोटदुखी आणि मळमळ होण्याचा त्रास सुरू झाला. प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान या पाचही जणांची प्राणज्योत मालवली. विषारी दारूमुळेच हा मृत्यू झाल्याचा थेट आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे.

कुटुंबावर काळाचा घाला

या भयंकर दुर्घटनेत पांढरे मळा परिसरात राहणाऱ्या सुनंदा साबळे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या मृत्यू तांडवात सुनंदा साबळे यांचे दोन सख्खे भाऊ अरुण डाडर आणि यशवंत पवार, तसेच बहिणीचा मुलगा राहुल क्षीरसागर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर त्यांचे आणखी एक नातेवाईक गणेश जगदने यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

गेल्या ४० वर्षांपासून अवैध दारू विक्री; पोलिसांवर आरोप

गेल्या ४० वर्षांपासून या परिसरात राहत असलेल्या सुनंदा साबळे यांनी स्थानिक प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. "या परिसरात गेल्या ४० वर्षांपासून राजरोसपणे दारूची बेकायदेशीर विक्री केली जाते. कधी हा अड्डा बंद होतो, तर कधी पुन्हा सुरू होतो. मात्र, पोलीस यावर कायमस्वरूपी कोणतीही कडक कारवाई करत नाहीत," असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. घरातील कमावते पुरुष गेल्याने साबळे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे.

"खायला नाही दिले तरी चालेल, पण दारू बंद करा!"

घरातील तरुण हसतीखेळती माणसे डोळ्यांदेखत गेल्याने सुनंदा साबळे यांनी सरकारकडे आर्त हाक मारली आहे. "सरकारने आम्हाला एक वेळ खायला नाही दिले तरी चालेल, पण गरिबांचे संसार उद्ध्वस्त करणारी ही विषारी दारू कायमची बंद करा," अशी करुण मागणी त्यांनी डोळ्यात पाणी आणून केली आहे.

स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण -

पुण्यातील हडपसर परिसरातील पांढरे मळा वस्तीत विषारी दारू प्रकरणामुळे पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या गंभीर घटनेनंतरही अद्यापपर्यंत पोलिसांकडून एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार स्वतः हडपसर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले असून, संपूर्ण घटनेची माहिती घेणार आहेत. तसेच तपासाचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पुणे पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT