Saam TV Breaking News Saam TV Breaking News
मुंबई/पुणे

Pune : पुण्यात भयंकर घडलं, कंपनीतील ३ कर्मचाऱ्यांचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू

Pune accident fiber cable workers dead : पुण्यातील निगडी येथील एका टेलिकॉम कंपनीच्या इमारतीत दुर्दैवी घटना घडली. लखन ढवारे (32), साहेबराव गिरसेट (36) आणि दत्ता होनाळे (38) असे या घटनेत मृत्यूमुखी पडले. डक्टमध्ये विषारी वायूमुळे गुदमरून या तिघांचा मृत्यू झाला.

Namdeo Kumbhar

  • पुण्यातील निगडी येथे टेलिकॉम कंपनीत दुर्दैवी अपघात.

  • विषारी वायूमुळे तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू.

  • लखन ढवारे, साहेबराव गिरसेट, दत्ता होनाळे मृत कामगारांची नावे.

  • पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून चौकशी सुरू केली.

Pune Nigdi telecom company toxic gas incident : पुण्यातील निगडी येथील कंपनीमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. टेलिकॉम कंपनीमध्ये काम करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाला. पोलिसांकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री ही दुर्घटना घडल्याची नोंद निगडी पोलिसांनी केली आहे. लखन ढवारे (32), साहेबराव गिरसेट (36), दत्ता होनाळे (38) अशी मृताची नावे आहेत. या घटनेनंतर निगडीमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास टेलिकॉम कंपनीच्या इमारतीच्या डक्टमध्ये तीन कामगारांनी प्रवेश केला होता. विषारी वायूमुळे श्वासोच्छवासामुळे गुदमरून तीन जणांचा मृत्यू झाला. निगडी पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. या कामगारांनी निगडीतील एका इमारतीत ऑप्टिकल फायबर केबलच्या कामासाठी डक्टमध्ये प्रवेश केला होता. निगडी पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक महेश बनसोडे यांनी सांगितले की, "आम्ही चौकशी पूर्ण केल्यानंतर गुन्हा दाखल करू. जबाबदारी निश्चित करून, या मृत्यूंना कारणीभूत असलेल्या व्यक्तींवर कारवाई केली जाईल."

लखन ढवारे (32), साहेबराव गिरसेट (36), दत्ता होनाळे (38) या तीन जणांसोबत डक्टमध्ये चौथा सहकारी गेला नव्हता. त्याने तात्काळ स्थानिकांना आणि अग्निशमन दलाला सतर्क केले. त्या तिन्ही कामगारांना डक्टमधून बाहेर काढून जवळच्या खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, टेलिकॉम कंपनीच्या ऑप्टिकल फायबरच्या कामासाठी चार कंत्राटी कामगार निगडीत आले होते. या घटनेचा साक्षीदार असलेला चौथा कामगार बाबासाहेब वाघ याने सांगितले की, डक्ट सुमारे 10 फूट खोल होते आणि त्यात पाणी साचले होते.

आम्ही डक्टचे झाकण उघडले आणि थोडा वेळ थांबलो. गिरसेट डक्टमध्ये गेला, पण त्याला अस्वस्थ वाटले. म्हणून होनाळे त्याला मदत करण्यासाठी डक्टमध्ये गेला. ते दोघेही प्रतिसाद देत नसल्याने ढवारे त्यांना मदत करण्यासाठी डक्टमध्ये गेला, असे वाघ याने सांगितले. ते तिघेही प्रतिसाद देत नसल्याने त्याने काहीतरी गडबड असल्याचे जाणवले आणि स्थानिकांना तसेच पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाला सतर्क केले, असेही वाघ म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात; वर्षश्राद्धाला जाताना काळाचा घाला; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: भंडाऱ्यात मुसळधार पावसाची हजेरी...

Strong Bones : हाडांना कमजोर करतात हे 7 अन्नपदार्थ; तज्ज्ञांनी दिला इशारा

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT