सचिन जाधव, साम टीव्ही, प्रतिनिधी
Pune : पुण्यात एका एसटी बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील भोरमध्ये दुर्गम दुर्गाडी मार्गावर एसटी आगाराची बस साईड पट्टीवरुन घसरली आणि गटारात कलंडली. एसटी बसमधील प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. एसटी बस गटारात जाऊन पलटी होण्याची आठवड्याभरातील ही तिसरी घटना आहे.
भोरमधील दुर्गम दुर्गाडी मार्गावर एसटी बस घसरुन गटारात कोसळली. अरुंद रस्त्यावर समोरुन येणाऱ्या वाहनाला साईड देताना ही बस गटारात खचल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघाताच्या वेळी बसमध्ये वाहन चालकासह पाच प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर जेसीबीच्या सहाय्याने बस गटारातून बाहेर काढण्यात आली.
मागील काही दिवसांमध्ये एसटी बसच्या अपघाताची ही तिसरी घटना असल्याचे म्हटले जात आहे. वारंवार एसटी बस साईड पट्टीवरुन घरुन गटारात कलंडत असल्याने प्रवासी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी संबंधित प्रशासनाने रस्त्यांचे रुंदीकरण, रस्त्यावरील खड्डे, साईड पट्ट्या मोठ्या भरावाच्या कराव्यात अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
पुण्यात एका ठिकाणी ३ तासांमध्ये १० अपघात
पुण्यातील देहू-येळवाडी रस्त्यावर ३ तासांच्या कालावधीत एकाच ठिकाणी १० दुचाकीस्वार अपघातग्रस्त झाले. रस्त्यावरील खड्डे तात्पुरत्या उपाययोजनांखाली मातीने भरण्यात आले होते. मात्र पावसामुळे खड्ड्यांमधील माती चिखलात बदलली आणि रस्ता अत्यंत निसरडा झाला. त्यामुळे वाहनचालकांचा तोल जाऊन अपघात झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.