Pune-Solapur Highway Saam Tv
मुंबई/पुणे

Pune-Solapur Highway: पुणे-सोलापूर प्रवास सुसाट होणार, ६ उड्डाणपूल अन् 'या' ठिकाणी होणार सर्व्हिस रोड, वाचा मास्टरप्लॅन

Pune-Solapur Highway 6 New Flyover: पुणे सोलापूर महामार्गावर आता ६ ठिकाणी नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. या मार्गावर अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे.

Siddhi Hande

पुणे सोलापूर मार्गावर बांधणार ६ नवीन उड्डाणपूल

अपघात रोखण्यासाठी नवीन उपाययोजना

६ उड्डाणपुलाचे काम सुरु

पूणे ते सोलापूर महामार्गामुळे प्रवास खूप सोपा आणि सुसाट झाला आहे. परंतु सोलापूर-पुणे महामार्गावर अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, आता अपघात कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने काही उपाययोजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे-सोलापूर मार्गावर ६ नवीन उड्डाणपूल

पुणे सोलापूर महामार्गावर ६ नवीन उड्डाणपूल उभारले जाणार आहे. सावळेश्वर ते वरवडे टोल नाक्यापर्यंत हे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे.याआधीही मोहोळ येथे एक उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. अपघात होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

सोलापूर-पुणे महामार्गावर सर्वाधिक अपघात झाले आहेत. सर्व्हिस रोडने विरुद्ध दिशेने ये-जा करत असल्याने हे अपघात होत आहेत. याचसोबत चारचाकी, जड वाहनांमुळे सर्व्हिस रोड अपुरा पडत आहे. यामुळेदेखील अपघात होत आहे. महामार्गाचे काम सुरु असताना अपघाताचे प्रमाण जास्त नव्हते. परंतु सध्याच्या परिस्थितीनंतर ६ नवीन उड्डाणपुल बांधणे गरजेचे आहे.

या ठिकाणी बांधणार उड्डाणपूल

मोहोळ आणि माढा तालुक्यात सहा ठिकाणी हे उड्डाणपुल बांधण्यात येणार आले. चिखली येथे पहिला उड्डाणपुल बांधणार आहे. याचे काम अंतिम टप्प्यात आले. यावली येथेदेखील उड्डाणपूल बांधला जात असून त्याचे काम दीड महिन्यात पूर्ण होईल. अर्जुनसोंड येथे एका बाजूचा सर्व्हिस रोड बाकी आहे. या कामासाठी ११ महिने लागतील. शेटफळ, सावळेश्वर आणि रांझणी येथे उड्डाणपुल बांधण्यात येत आहे.

सध्या उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने यावली, शेटफळ, चिखली या ठिकाणी सर्व्हिस रोडने वाहतूक वळवली आहे. परंतु सर्व वाहने सर्व्हिस रोडने जात असल्याने वाहन चालकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मोदींना मंत्रिमंडळात फडणवीस हवेत'; मोदी-फडणवीस भेटीनंतर राऊतांचा दावा

Pune Roads Pothole: खड्ड्यांनी घेतला शाळकरी मुलाचा जीव; वडिलांसोबत ट्युशनला जाताना घडली दुर्घटना

महाराष्ट्रात 2 कोटी मतदार वगळणार? 'अल्पसंख्यांकांना टार्गेट करण्यासाठी SIR' , वडेट्वीवारांचा आरोप

Delhi : दिल्लीतील दिग्गज नेत्यासह ६ जणांना अटक; माजी CEO आणि IAS अधिकाऱ्याचाही समावेश, एसीबीची सर्वात मोठी कारवाई

Kumbh Mela Tender Scam: जळगावात कुंभमेळा बोगस टेंडरचा छापखाना; बिंग कसं फुटलं? घोटाळ्याची इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT