Pune News: वाहतुक कोंडीतून पुणेकरांची सुटका! चांदणी चौक उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला; आज उद्घाटन

chandni chowk bridge inauguration: गेल्या काही महिन्यांपासून पुणे नव्हे तर देशभर चर्चेत असलेल्या पुण्यातील चांदणी चौकाचे काम हे पूर्ण झाले आहे.
Pune News
Pune NewsSaamtv
Published On

सचिन जाधव, प्रतिनिधी...

Pune News: गेल्या काही महिन्यांपासून पुणे नव्हे तर देशभर चर्चेत असलेल्या पुण्यातील चांदणी चौकाचे काम हे पूर्ण झाले आहे. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली यांचे उद्घाटन होणार आहे.

आजपासून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहणार होते, मात्र अचानक त्यांच्या दौऱ्यात बदल झाला असून ते येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

Pune News
Latur Political News: 'लातूरचा नवरदेव मुंबईत ठरतो, निलंग्याचा नवरदेव दिल्लीत ठरतो', अमित देशमुखांची भाजप आमदारावर मिश्किल टीका

याबाबत अधिक माहिती अशी की, चांदणी चौकातील (Chandani Chouk) वाहतूक कोंडीचा फटका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना बसल्यानंतर सात वर्षे रखडलेल्या चांदणी चौकातील पुलाने अवघ्या दहा महिन्यांत या पुलाचे काम पूर्ण केले. आज चांदणी चौकातील उड्डाण पुलाचे उद्घाटन होणार आहे.

मुख्यमंत्र्यांची उपस्थिती...

या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार होते. मात्र अचानक त्यांच्या कार्यक्रमात बदल झाला असून मुख्यमंत्री साताऱ्याला त्यांची गावी असल्याने येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. अचानक मुख्यमंत्र्यांनी दौरा रद्द केल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Pune News
Satara News: सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी बांबू लागवड आणि पर्यटन यावर लक्ष केंद्रीत करणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

२८ फेब्रुवारी २०१९ ला या पुलाचे उद्घाटन करण्यात आले होते. तब्बल ४०० कोटी रुपये खर्च करुन हा पुल बनवण्यात आला आहे. या पुलावरुन सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी प्रति तासाला सुमारे १ लाख वाहने जातात तर इतर वेळी प्रतितास ३० हजार वाहने जातात.

असे आहेत चांदणी चौकातील ८ रॅम्प....

१. मुळशी - सातारा

२. मुळशी - मुबंई

३. मुळशी - पाषाण

४. सातारा - कोथरूड ते मुळशी

५. पाषाण - मुबंई

६ .पाषाण - सातारा

७. सातारा - कोथरूड ते पाषाण

८ . सातारा -मुळशी (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com