pune news  Saam tv
मुंबई/पुणे

पुण्याच्या सिंहगड घाटात भीषण अपघात; दुचाकी थेट दरीत कोसळली

sinhagad ghat accident : पुण्यातील सिंहघाटात अपघाताची घटना घडली. पर्यटकांची दुचाकी थेट दरीत कोसळली.

Vishal Gangurde

पुण्यात पुन्हा भीषण अपघात

पुण्यातील सिंहघाटात घडला भीषण अपघात

अपघातात दोन पर्यटक जखमी

सचिन जाधव, साम टीव्ही

पुण्यात पुन्हा एकदा गंभीर अपघात झाला आहे. पुण्यात पहाटे वानवडी भागात अपघात झाल्याची घटना ताजी असताना सिंहगड घाटातही अपघात घडला आहे. पुण्यातील सिंहगड घाटात दुचाकी थेट दरीत कोसळून अपघात झाल्याची घटना घडली. या अपघात दोन पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत.

पुण्यातील सिंहगड घाटात दोन पर्यटकांच्या दुचाकीचा अपघात झाला. त्यांची दुचाकी थेट घाटात कोसळल्याने दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. पूजा चव्हाण आणि सौरव पासलकर अशी जखमी दोन पर्यटकांची नाव आहेत.

अपघात नेमका कसा घडला?

सिंहगड किल्ल्यावरून खाली येताना चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावरील ११ हजार पॉइंट परिसरातून दुचाकी थेट खोल दरीत कोसळून अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताचं वनविभाग, वन समितीचे कर्मचारी, स्थानिक नागरिक, पर्यटक आणि आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी पोहोचली. त्यांच्या अथक प्रयत्नांनंतर दोन्ही जखमींना दरीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

दुचाकी दरीत कोसळून मोठा अपघात झाला. या अपघातात तरुणी पूजा चव्हाण यांच्या पायाला जबर मार लागलाय. प्राथमिक तपासणीत पाय 2 ते 3 ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याचे दिसून आले. तर तरुण सौरव पासलकर याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

पुण्याच्या वानवडीत कारचा अपघात

पुण्याच्या वानवडी येथील परमार नगर परिसरात केंट एक्सक्लुझिव्ह अपार्टमेंटजवळ आज शनिवारी पहाटे अपघात झाला. एका खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या ऑफिस कारचा अपघात झाला. कारमध्ये 4-5 कर्मचारी आणि एक सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकाला आदळून मागे उलटल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अपघातात सुदैवाने सर्वांना किरकोळ दुखापत झाली. अपघातनंतर कारमधील सर्वांना दुसऱ्या वाहनातून हलवण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपचा एकनाथ शिंदेंना मोठा दणका! दोन बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी हाती घेतलं कमळ; महायुतीत खळबळ

Sunday Horoscope: रविवारपासून बदलणार या 5 राशींचे नशीब! पैशांचा पाऊस, करिअरमध्ये मोठी झेप; वाचा संपूर्ण राशीभविष्य

Ind vs SL : टीम इंडियाला जोरदार झटका; स्टार फलंदाज वेदनेनं विव्हळत मैदानाबाहेर गेला, चिंता वाढवणारा तो फोटो होतोय व्हायरल

India : पाण्यावर तरंगतंय संपूर्ण गाव! निसर्गाचा हा अद्भूत चमत्कार पाहून व्हाल थक्क

Death News: २६वा वाढदिवस साजरा करण्याआधीच काळाचा घाला; प्रसिद्ध मॉडेल-इन्फ्लुएन्सरचं दुर्दैवी निधन

SCROLL FOR NEXT