Pune Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Accident: खेडमधील पिकअप अपघातातील ९ मृतांची नावं आली समोर, पापळवाडी गावावर शोककळा

Khed Pickup Accident: पुण्यातील खेडमध्ये भयंकर अपघात झाला. या अपघातामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला तर २२ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामधील ९ मृत महिलांची नावं समोर आली आहेत.

Priya More

रोहिदास गाडगे, पुणे

पुणे जिल्ह्यातल्या खेडमध्ये तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त देवाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला तर २२ जण जखमी झाले आहेत. जखमींमधील अनेक जणांची प्रकृती गंभीर आहे. या अपघातामुळे एकच खळबळ उडाली आहे. अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. या अपघातामधील सर्व मृत आणि जखमींची नावं समोर आली आहेत.

पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील पापळवाडी गावातील महिला श्रावणी सोमवारनिमित्त कुंडेश्वराचे दर्शन घेण्यासाठी पिकअप करून निघाल्या होत्या. १२ वाजताच्या सुमारास त्यांच्या वाहनाला अपघात झाला. कुंडेश्वर डोंगरावर पिकअप चढत असताना दरीत कोसळला. ३० पेक्षा अधिक महिला भाविकांनी खचाखच भरलेला टेम्पो घाटातील नागमोडी वळणावर रिटर्न आला आणि थेट १०० फूट खोल दरीत कोसळला. दरीत कोसळत असताना पिकअपने ८ वेळा पलटी खालल्या त्यावेळी पिकअपमधील महिला बाहेर फेकल्या गेल्या.

या अपघातामध्ये काही महिलांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील मृतांचा आकडा ९ वर पोहचला आहे. तर अनेक महिलांच्या हाता-पायाची हाडं तुटली आहेत. जखमींमध्ये अनेकांची प्रकृती गंभीर आहे. जखमी महिलांवर राजगुरूनगर, ओसरी, पुणे याठिकाणच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साळुंखे हॉस्पिटल -खेड, साईनाथ हॉस्पिटल- भोसरी, बांबळे हॉस्पिटल, केअर वेल हॉस्पिटल- चाकण, शिवतीर्थ हॉस्पिटल, गावडे हॉस्पिटल, पोखरकर हॉस्पिटल- खेड या सर्व महिला पापळवाडी गावातील असल्यामुळे या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. सध्या खेड पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.

अपघातातील मृत महिला भाविकांची नावं -

१) शोभा ज्ञानेश्वर पापळ, ३३ वर्षे

२) सुमन काळुराम पापळ, ५० वर्षे

३) शारदा रामदास चोरगे, ४२ वर्षे

४) मंदाबाई कानिफ दरेकर, ५५ वर्षे

५) संजीवनी कैलास दरेकर, ५० वर्षे

६) मिराबाई संभाजी चोरगे, ५० वर्षे

७) बायडाबाई न्यानेश्वर दरेकर, ५५ वर्षे

८) पार्वतीबाई दत्तू पापळ, ६२ वर्षे

९) सखुबाई तान्हाजी चोरगे, ८० वर्षे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dehydration despite drinking water: 3 लीटर पाणी प्यायल्यानंतरही डिहायड्रेशनचा त्रास होतोय? वाचा काय आहेत यामागची कारणं

Snake Fact: नाग आणि नागीणमध्ये फरक काय? कसा ओळखायचा?

Bread Pizza Recipe: घरच्या घरी बनवा स्वादिष्ट ब्रेड पिझ्झा, सोप्या पद्धतीने तयार करा मजेशीर स्नॅक

iPhone 17 Pro: 'या' ५ देशांमध्ये Apple iPhone 17 Pro स्वस्तात मिळणार, ₹37,424 होईल बचत

Ratnagiri Tourism: रत्नागिरीपासून अवघ्या पाऊण तासाच्या अंतरावर वसलंय स्वर्गाहून सुंदर ठिकाण; निळाशार समुद्र, सोनेरी वाळू अन् लपलेलं पर्यटन रत्न

SCROLL FOR NEXT