pune crime News Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime : पुणे हादरलं! अनैतिक संबंधात अडसर; बायकोने डाव रचला अन् नवरा पलंगावर झोपलेला असतानाच...

pune crime News : पुणे एकदा हत्याकांडाने हादरलं आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या नवऱ्याची हत्या केल्याची घटना घडली. बायकोने डाव रचत नवऱ्याची हत्या केली.

Vishal Gangurde

अक्षय बडवे, साम टीव्ही

Pune Crime News : पुण्यात काही महिन्यांपूर्वी भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी त्यांची पत्नी आणि तिचा प्रियकर यांना अटक करण्यात आली होती. याच घटनेची पुनरावृत्ती पुण्यातील लोणी काळभोर परिसरातून समोर आली आहे. अनैतिक संबंधास अडसर ठरत असल्याने पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीचा डोक्यात फावडा घालून हत्या केली.

रवींद्र काशिनाथ काळभोर असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी अवघ्या तीन तासात पत्नी शोभा रविंद्र काळभोर आणि तिचा प्रियकर गोरख त्र्यंबक काळभोर यांना अटक केली आहे. याप्रकरणी रवींद्र यांचे भाऊ भाऊसाहेब काशिनाथ काळभोर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी शोभा रविंद्र काळभोर आणि गोरख त्र्यंबक काळभोर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत ही घटना घडली. हत्येची घटना रायवाडी भागात मंगळवारी सकाळी ७ वाजता घडली. रविंद काळभोर शेती करून घर सांभाळतात होते, त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार होता. सकाळी रवींद्र काळभोर हे मंगळवारी घराबाहेरील असलेल्या पलंगावर रक्ताच्या थारोळ्यात पडून आल्याचे दिसून आले.

शोभा काळभोर यांचे गोरख काळभोर यांच्याशी अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अनैतिक संबंधात अडसर होत असल्याने रवींद्र यांचा कायमचा काटा काढायचा आरोपींनी कट रचला होता. सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास रवींद्र हे त्यांच्या घराबाहेरील पलंगावर झोपलेले असताना, दोन्ही आरोपींनी संगनमत करून त्याच्या डोक्यात फावड्याने वार करून खून केला. लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या तीन तासात या प्रकरणाचा तपास करत पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

SCROLL FOR NEXT