pune news Saam tv
मुंबई/पुणे

पुण्यात रक्तरंजित थरार; आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम संपल्यानंतर नवऱ्याकडून बायकोवर धारदार शस्त्राने वार

pune news : पुण्यात १४ एप्रिलच्या दिवशी रक्तरंजित थरार पाहायला मिळाला. जयंतीचा कार्यक्रम संपल्यानंतर नवऱ्याने बायकोवर धारदार शस्त्राने वार केला.

सागर आव्हाड साम टीव्ही पुणे

पुण्यात घटस्फोटाची केस सुरू असताना पतीकडून पत्नीवर हल्ला

चाकूने हत्याराने वार केला असल्याचा आरोप

हल्ला करणारा आरोपी अटकेत

पुण्याच्या खडकीतून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घटस्फोटाची केस सुरू असताना नवऱ्याकडून पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जयंती कार्यक्रमादरम्यान घडलेल्या या प्रकारात महिलेवर चाकूसदृश धारदार हत्याराने वार करण्यात आले आहेत. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी खडकी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राहुल महादेव कांबळे (30) असे आहे. नवऱ्याने हल्ला केल्यानंतर सायली सयाजी भिसे (वय २२) हिने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सायली भिसे आणि राहुल कांबळे यांचा काही महिन्यांपूर्वी आळंदी येथे विवाह झाला होता. त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ते चर्चेत आले होते. मात्र, वैवाहिक वादामुळे दोघे वेगळे राहत होते. त्यांचा घटस्फोटाचा खटला न्यायालयात प्रलंबित आहे.

त्या दिवशी नेमकं काय घडलं?

१४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त औंध रोडवरील चौकातील आयोजित कार्यक्रमाला सायली भिसे ही तिच्या मैत्रिणीसोबत उपस्थित होती. कार्यक्रम संपल्यानंतर रात्री घरी परतत असताना सुमारे पावणे बारा वाजण्याच्या सुमारास राहुल कांबळे त्यांच्या समोर आला. यावेळी त्याने सायली यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी प्रतिकार केल्यावर आरोपीने चाकूसारख्या धारदार हत्याराने कपाळ, गाल, खांदा, पाठ आणि ओठाखाली वार करत त्यांना जखमी केले. या प्रकरणी खडकी पोलीस अधिक तपास करत आहेत.

सायली भिसेने काय आरोप केला?

सायलीने म्हटलं की, राहुल महादेव कांबळे विरोधात गुन्हा दाखल केलं आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पण त्याच्याविरोधात कोणतीही कडक कारवाई करण्यात आलेली नाही. पोलिसांत गुन्हा दाखल करून काही उपयोग झालेला नाही. त्याच्या विरोधात योग्य असे गुन्हे दाखल केलेले नाहीत. त्याला कोणाचा पाठिंबा मिळतोय, हे मला माहीत नाही. आमची शिवाजीनगर कोर्टात घटस्फोटाची केस सुरू आहे. त्याला सही करायची नाही, त्याचा राग काढत आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आमदारांच्या पाहणी दौऱ्यात सुपरवायझरला मारहाण; भाजप नेत्यासह चौघांवर गुन्हा दाखल; राज्यात खळबळ

Pathology lab reports: रिपोर्टवर सही करणारे डॉक्टर प्रत्यक्षात तपासणी करतात का? ‘घोस्ट पॅथॉलॉजिस्ट’ प्रकारामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

Turmeric Price : मोठी बातमी! हळदीने गाठला विक्रमी उच्चांक; ९ वर्षांनंतर भाव थेट 'तितक्या' हजारांवर

Sabudana Vada Recipe : १० मिनिटांत बनवा कुरकुरीत साबुदाणा वडे, पाहा सोपी ट्रिक

Maharashtra News Live Update: पुण्यात राजस्थानच्या तिघांकडून ७८ हजारांचे अफीम जप्त; तस्करीचे रॅकेट उघडकीस

SCROLL FOR NEXT