Mutha River Tragedy: Fire brigade retrieving the body of a 67-year-old man near Pune Municipal Corporation premises. Saam TV News
मुंबई/पुणे

Pune News : खळबळ! पुण्याच्या मुठा नदीत तरंगताना आढळला मृतदेह

Mysterious Death Pune Shocked: पुण्यात मुठा नदीत ६७ वर्षीय वयोवृद्धाचा मृतदेह आढळला. मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट आहे. पोलिस तपास सुरू असून आत्महत्या की हत्या याबाबत संभ्रम कायम आहे.

Bhagyashree Kamble

पुण्यातील मुठा नदीत एका वयोवृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. नदी पात्रात मृतदेह वाहून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन दलाकडून हा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह रूग्णालयात पाठवण्यात आले असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.

प्रकाश मारुती काळेकर (वय वर्ष ६७)असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्या व्यक्तीचा मृतदेह पुणे महानगरपालिका कार्यालयाजवळील नदी पात्रात दिसून आला. नदी पात्रात मृतदेह वाहून जात असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले.

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. नेमकी ही हत्या आहे की आत्महत्या? याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. या प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यात नाल्यात वाहून गेलेल्या महिलेचा मृत्यू

पुण्यातील नवले पुलाजवळ असलेल्या नाल्यात एक महिला वाहून गेली आहे. शोभा मनोहर महिमाने (वय वर्ष ६५) असे मृत महिलेचं नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, महिमाने या महिला कोल्हापूरहून पुण्यात आल्या होत्या. बंगळूरू हायवेवर नवले पुलाजवळ रिक्षा पकडण्यासाठी रस्ता ओलांडत असताना त्या नाल्यात पडल्या. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने त्या वाहत गेल्या.

ही घटना गेल्या रात्री घडली असून, आज वारजे स्मशानभूमीजवळील भागात अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात मृतदेह पाठवला आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

SCROLL FOR NEXT