Pune Shivshahi CCTV News  
मुंबई/पुणे

Pune Shivshahi : शिवशाही बसमध्ये बलात्कार, CCTV फुटेज आलं समोर

Pune Shivshahi CCTV : स्वारगेट आगारामध्ये अनेक बस उभ्या होत्या, पण शिवशाही बसचा दरवाजा लॉक का नव्हता? असा सवाल उपस्थित झाला आहे. फलटणाला जाणाऱ्या मुलीवर पुण्यात शिवशाही बसमध्ये अत्याचार करण्यात आलाय.

Namdeo Kumbhar

Pune Shivshahi CCTV News : स्वारगेट डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरूणीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. २५ जानेवारी रोजी पहाटे नराधमाने तरूणीला एकटीला पाहून डाव साधला. २५ फेब्रुवारी रोजी ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळचे सीसीटीव्ही फुटेज साम टीव्हीच्या हाती आले आहे. त्यामध्ये आरोपी नराधम बाहेर निघताना स्पष्ट दिसत नाही. ज्या बसमध्ये ही दुर्देवी घटना घडली, ते सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत आहे. स्वारगेट आगारामध्ये अनेक बस उभ्या होत्या, पण शिवशाही बसचा दरवाजा लॉक का नव्हता? असा सवाल उपस्थित झाला आहे.

सीसीटीव्हीमध्ये नराधम तरूण शिवशाही बसमधून बाहेर येताना दिसत आहे. सीसीटीव्हीच्या आधारावर पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आहे. दत्तात्रय गाडे असे त्या आरोपीचे नाव आहे. हा शिरूर येथील असल्याचे समोर आलेय. त्याच्यावर अनेक गुन्ह्याची नोंद आहे. त्याचा पोलिस शोध घेत आहेत.

फलटणला जाण्यासाठी २६ वर्षीय तरूणी पहाटेच स्वारगेट बस स्थानकात पोहचली. ती बाकड्यावर एकटीच बसली होती. त्यावेळी डाव साधून नराधमाने तिच्याशी संवाद साधला. तिला तुझी बस डेपोत लागली आहे,तिच बस फलटणला जाणार असल्याचे त्याने सांगितले. मुलीला टॉर्च सुरू करून शिवशाहीमध्ये जाण्यास सांगितले. त्यानंतर आरोपीही बसमध्ये गेला अन् अत्याचार केला. बसमध्ये आरोपी जाताना आणि बाहेर येताना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेय. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

शिवशाही बसमध्ये तरूणीवर बलात्कार झाल्याची बातमी साम टीव्हीने दाखवल्यानंतर प्रशासानेही कठोर पावले उचलली आहे. स्वारगेट आगारात कामाला असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची चौकशीचे आदेश परिवाहन मंत्र्यांनी दिले आहेत. शिवशाही बसचा दरवाजा लॉक का नव्हता? असा सवाल या घटनेनंतर उपस्थित झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mirchi Bhaji Recipe: हॉटेलसारखी खुसखुशीत मिरची भजी कशी बनवायची?

Maharashtra Live News Update: मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

New Year 2026 Trip : पांढरी वाळू, निळाशार समुद्र, सूर्यास्ताचा नजारा; मुंबईजवळ कॅम्पिंगचे सुंदर लोकेशन

Horoscope: ओळखीचा होणार फायदा, व्यवसायात धनलाभाचा योग; जाणून घ्या कोणत्या राशींसाठी खास आहे आजचा दिवस

Hair Oil Benefits: हिवाळ्यात केस गळतीला करा बाय बाय, घरीच बनवा कढीपत्ता, कांदा आणि कोरफडीचा तेल

SCROLL FOR NEXT