Pune Accident Death News Saam TV News
मुंबई/पुणे

अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात; दुध टँकरची ट्रकला धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Pune Shirur Road Accident: शिरूर तालुक्यात रविवारी पहाटे टँकर-ट्रक भीषण अपघात. अहिल्यानगर वडनेर गावातील वाजे कुटुंबातील तिघांचा मृत्यू. लहानगा युवांश घटनास्थळी ठार, तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू.

Bhagyashree Kamble

  • शिरूर तालुक्यात रविवारी पहाटे टँकर-ट्रक भीषण अपघात

  • अहिल्यानगर वडनेर गावातील वाजे कुटुंबातील तिघांचा मृत्यू

  • लहानगा युवांश घटनास्थळी ठार, तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू

  • या अपघातामुळे वडनेर गावात शोककळा पसरली

पुण्यातील शिरूर तालुक्यात रविवारी पहाटे भीषण अपघाताची घटना घडली. मुंबईहून दुध वाहतूक करणाऱ्या टँकरमधून प्रवास करणाऱ्या वाजे कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. टँकरने कवठे येमाई (अष्टविनायक महामार्ग) परिसरात मालवाहू ट्रकला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की टँकरचा चक्काचूर झाला. मृत व्यक्ती अहिल्यानगर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.

शिरूर तालुक्यातील कवठे येमाई (अष्टविनायक महामार्ग) परिसरात रविवारी पहाटे भीषण अपघात घडला. अहिल्यानगर जिल्ह्यातील वडनेर (ता. पारनेर) येथील वाजे कुटुंबातील तिघांचा करुण अंत झाला. ज्ञानेश्वर मकाजी वाजे (३८), शांताबाई मकाजी वाजे (६८) आणि त्यांचा मुलगा युवांश (वय ५) असे अपघाती मृत व्यक्तींचे नावे आहेत.

ज्ञानेश्वर वाजे हे आई आणि लहान मुलासह मुंबईहून दुध वाहतूक करणाऱ्या टँकरमधून आपल्या गावी जात होते. पहाटे सुमारास काळूबाई नगर येथील बंटी ढाब्याजवळ दुध टँकर हा मालवाहू ट्रकला जोरदार धडकला. धडक इतकी भीषण होती की टँकर थेट ट्रकमध्ये घुसला. अपघात घडल्यानंतर स्थानिकांनी अपघातस्थळी धाव घेतली.

तसेच जखमींना वाचवण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांनी जखमींना बाहेर काढून थेट रूग्णालयात हलवले. मात्र, लहानगा युवांश घटनास्थळीच ठार झाला, तर गंभीर जखमी झालेल्या शांताबाई आणि ज्ञानेश्वर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. टँकर चालक जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी अपघातामुळे वडनेर गावावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : लोकसभेत घटनादुरूस्ती विधेयक मांडले, विरोधकांचा गोंधळ

Pune News : पुणेकरांना मोठा दिलासा; सिंहगड रोडवरील नवा उड्डाणपूल लवकरच होणार सुरू

Shocking: शाळेत हत्येचा थरार! नववीच्या विद्यार्थ्याने दहावीच्या विद्यार्थ्याला चाकूने भोसकलं, जमावाकडून शाळेची तोडफोड

Chandrabhaga River Flood : पंढरपुरात ४०० नागरिकांचे करणार स्थलांतर; चंद्रभागेच्या पुराने कुटुंब बाधित

Bail Pola 2025: यंदा बैलपोळा सण कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि महत्व

SCROLL FOR NEXT