pune crime  Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime : आईने स्वत:च्या बाळाचा जीव घेतला, घराच्या ओट्यावर आपटून संपवलं; चौकशीत सांगितलं धक्कादायक कारण

pune crime news : शिरूरच्या महिलेने लग्न करण्यासाठी पोटच्या मुलाला क्रूरपणे संपवल्याची घटना घडली आहे.

रोहिदास गाडगे

पुण्यातील शिरूरमध्ये घडली धक्कादायक घटना

विकृत विचाराच्या आईनेच केली मुलाची हत्या

दुसऱ्या लग्नाच्या विचारातून गुन्हा केल्याची पोलिसांकडे कबुली

पुणे जिल्ह्यातून हादरवणारी घटना समोर आली आहे. पुण्यातील शिरूर तालुक्यातील भांबर्डे येथे आईनेच स्वत:च्या पोटच्या ११ महिन्यांच्या मुलाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दुसरे लग्न करण्याचा विचार असताना मुलगा आड येत असल्याच्या कारणावरून आईनेच टोकाचा निर्णय घेतल्याचे तपासात समोर आलं आहे.

पूजा पवार असे आरोपी आईचे नाव आहे. पूजाने मुलगा यश पवार (११ महिने) याला निर्घृणपणे संपवलं. मुलगा सतत रडायचा. त्यात आरोपीला पूजाला दुसरे लग्न करायचे होते. मात्र लग्नात मुलाचा अडथळा ठरेल, या विकृत विचारातून आईनेच लेकाचा जीव घेतल्याची धक्कादायक कबुली पोलीस चौकशीत दिली आहे.

आरोपी आईने मुलाचे डोके घरासमोरील सिमेंट ओट्यावर आपटून त्याची हत्या केली. इतकेच नव्हे, तर या गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी रक्त धुवून टाकत त्याचा मृतदेह कपड्यांच्या बॅगेत भरला. त्यानंतर त्या बॅगेत दगड टाकले. शेतातील विहिरीत फेकून दिले. आईने मायेचा संबंध विसरून स्वत:च्या स्वार्थासाठी पोटच्या लेकाची हत्या केल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

नांदेडमध्ये शिवसेना कार्यकर्त्याची हत्या

नांदेडमध्ये गेल्या काही दिवसांत गुन्हेगारी वाढल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांत पाच जणांच्या हत्या झाल्या आहेत. तर नांदेड शहरातील श्रीनगर भागात काल शिवसेना कार्यकर्त्याची रस्त्यात गाठून धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. शिवसेना कार्यकर्त्याच्या हत्येने भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. शिवसेना कार्यकर्त्याची हत्या का केली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना केंद्रीय मंत्र्यांची खुली ऑफर, राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या

Ambenali Ghat Closed: आंबेनळी घाट ४ दिवस वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद, पर्यायी मार्ग कोणते? VIDEO

Saturday Horoscope : नवी संधी मिळणार; ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: रत्नागिरी - खेड शहराच्या मटण मार्केट परिसरात शिरलं जगबुडी नदीच्या पुराचं पाणी

Prajakta Mali Farmhouse: निसर्गाच्या सान्निध्यातील प्राजक्ता माळीचं आलिशान फार्महाऊस; जाणून घ्या एका दिवसाचं भाडं

SCROLL FOR NEXT