पुण्यातील वाढती गुन्हेगारी राज्यात चर्चेचा विषय असतानाच आता शनिवारवाड्यातील नमाज पठणा वरुन राजकारण सुरु झालंय. शनिवारवाड्यामधील मजारवर चादर चढवून जागा बळकावण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप भाजपने केलाय. मात्र यावर महायुतीतील मित्रपक्षांनीच आक्षेप घेत हल्लाबोल केलाय. भाजपच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादीने आंदोलन केलं. या मजारची 1936 साली पुरातन विभागात नोंद असून खासदार मेधा कुलकर्णी यांच्यामुळे सामाजिक सलोखा बिघडतोय, असा आरोप रुपाली ठोंबरे यांनी केलाय.
दुसरीकडे शिंदेसेनेनंही भाजपवर निशाणा साधलाय. कुणीही आपणच सरकार आहोत या थाटात वागू नये, असा टोला नीलम गो-हे यांनी लगावलाय. तर शनिवारवाडा प्रकरणावरून भाजपचे मंत्री नितेश राणेंनी संताप व्यक्त केलाय.
दरम्यान, शनिवारवाड्यातील नमाज पठण प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.शनिवार वाड्यात नमाज पठण चालणार नाही, चलो शनिवार वाडा, अशी हाक देत मेधा कुलकर्णी यांनी रविवारी आंदोलन केलं होतं. गोमुत्र शिंपडून परिसराचं शुद्धीकरण केलं. ही मजार हटवण्यासाठी 8 दिवसांचा अल्टीमेटम हिंदुत्ववादी संघटनांनी दिलाय. शनिवारवाड्यासमोर आणि बाजूला पेशवेकालीन दर्गा आहे.
पेशव्यांना त्यांची अडचण नव्हती मग तुम्हाला का? असा सवाल विरोधक करतायेत. पालिका निवडणुका तोंडावर आल्याने मतांसाठी मुस्लिम धर्मीयांना दुखावण्याचं धाडस सत्ताधारी पक्ष करत नाहीत. त्यामुळेच नमाज पठणवरुन महायुतीत जुंपली आहे. आधीच वाढत्या गुन्हेगारीमुळे पुणे अशांत झालं आहे. आता ऐतिहासिक शनिवारवाडावरुन राजकारण तापू लागलं आहे. हा वाद कोणत्या वळणावर जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.