Thackeray vs Shinde: शिंदे 'नरकासूर'; नरक चतुर्दशीवरून उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर विखारी टीका

Thackeray vs Shinde: पालिका निवडणुका तोंडावर आल्याने ठाकरे सेनेची एकनाथ शिंदेंवरील टीका आणखी विखारी होत आहे. नरक चतुर्दशीनिमित्त ठाकरेंनी शिंदेंना काय टोला लगावलाय ? आणि त्याला शिंदे सेनेच्या नेत्यांनी कसं प्रत्युत्तर दिलंय ते पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Thackeray vs Shinde
Uddhav Thackeray targets Eknath Shinde with a “Narakasur” jibe during Narak Chaturdashi event — sparks political row in Maharashtra.saam tv
Published On
Summary
  • नाशिकमधील भाजप कार्यकर्त्यांचा ठाकरेसेनेत प्रवेश

  • महापालिका निवडणुकांसाठी आधीच राजकीय पक्षांनी कंबर कसलीय

  • नरक चतुर्दशीनिमित्त ठाकरेंनी शिंदेंना टोला लगावलाय.

नरक चतुर्दशीच्या निमित्तानं ठाकरेसेना आणि शिंदेसेनेतील राजकीय युद्ध पुन्हा एकदा भडकलयं. ठाकरेसेनेनं शिंदेंसेनेवर कठोर शब्दात हल्ला चढवलाय. नाशिकमधील भाजप कार्यकर्त्यांनी ठाकरेसेनेत प्रवेश केल्यानंतर नरकासुराचा वध करण्यासाठी तुम्ही शिवसेनेत आलात, असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं. इतकचं काय नरकासुर कोण आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही, असं म्हणत ठाकरेंनी शिंदेंना अप्रत्यक्ष टोला लगावलाय.

दुसरीकडे नरकासुराचा उगम गुवाहाटीतून झाला त्यामुळे महाराष्ट्रातील या 'गद्दार नरकासुरां'चाही राजकीय अंत होईल, असा हल्लाबोल ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलाय. दरम्यान शिंदेसेनेनंही ठाकरेसेनेच्या विधानांवर जोरदार टीका केलीय. महापालिका निवडणुकांसाठी आधीच राजकीय पक्षांनी कंबर कसलीय.

Thackeray vs Shinde
Bacchu Kadu: आत्महत्या करण्यापेक्षा आमदारांना कापा; बच्चू कडूंचं वादग्रस्त वक्तव्य

त्यातच ठाकरेसेना आणि शिंदेसेनेतील लढाई ही शाब्दिक टीकेपुरती मर्यादीत न राहता आता प्रतिष्ठेची झालीय. सत्तासंघर्ष तीव्र होताना दिसतोय. ठाणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष आमनेसामने उभे राहणार हे निश्चित.. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत कोण कोणाला चितपट करतं. जनता कोणाच्या पाठिशी उभी राहते... आणि 'राजकीय नरकासुर' कोणता पक्ष ठरतो. हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Thackeray vs Shinde
Maharashtra Government: महाराष्ट्राला मिळाले 47 नवे अपर जिल्हाधिकारी; 47 अधिकाऱ्यांना बढत्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com