
महाराष्ट्र सरकारने महसूल विभागातील 47 अधिकाऱ्यांना बढती दिली.
अपर जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.
दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर अधिकाऱ्यांना गोड बढती मिळाली आहे.
देशभरात दिवाळीचा सण साजरा केला जात असून दिवाळी बोनसही अनेक कर्मचाऱ्यांना मिळालाय. त्यामुळे सणाचा आनंद वाढलाय. त्याचदरम्यान राज्य सरकारने महसूल विभागातील अधिकाऱ्यांसाठी एक खूशखबर दिली आहे. गेल्या दहा वर्षांपासून बढत्यांच्या प्रतिक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांना गोड बढत्या झाल्याची बातमी मिळाली आहे.
आज राज्याच्या महसूल विभागातील 47 अधिकाऱ्यांना बढत्या देण्यात आल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्राला नवे 47 अपर जिल्हाधिकारी मिळालेत. गेल्या काही वर्षांपासून अधिकाऱ्यांच्या बढत्या रखडल्या होत्या. ऐन दिवाळीच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारकडून आज शासन आदेश जारी करण्यात आलाय.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट दिलीय. आज मंत्रालयातील दालनात जाऊन बावनकुळे यांनी राज्यातील सर्वच जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यानंतर बढत्यांची घोषणा केली. महसूल विभाग जनतेच्या आशा, आकांक्षांना मूर्तरूप देणारा विभाग आहे.
हा विभाग अधिकाधिकपणे जनताभिमुख व्हावा. पारदर्शी रहावा, यासाठी सगळे मिळून प्रयत्न करू. सर्वसामान्य जनतेशी थेट संबंध येणाऱ्या मोजक्या शासकीय विभागांपैकी एक विभाग असल्याचं बावनकुळे यावेळी म्हणाले.
दरम्यान अधिकाऱ्यांच्या पद पात्रता तपासून त्यांच्या बदल्या केल्या गेल्या आहेत. तसेच पदोन्नत झालेले अधिकारी जर ३० दिवसांचे आत रूजू न झाले नाहीत तर त्यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ मधील तरतुदीनुसार शिस्तभंग कारवाई केली जाणार आहे.
सामान्य प्रशासन 15 ऑक्टोबर रोजीच्या इतिवृत्तान्वये, आस्थापना मंडळ (क्रमांक 2) यांनी अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) या पदोन्नतीच्या पदाची पात्र पात्रता तपासून निवड सूची वर्ष 2025-26 मध्ये अपर जिल्हाधिकारी (गट-अ) (वेतनश्रेणी एस २५-१ ७८,८००- २,०९,२००/-) या संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) (गट-अ) (वेतनश्रेणी एस २७-११,२३,१००-२,१५,९००/-) या संवर्गात नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती देण्याबाबत शिफारस करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ६३ (६) (३) मधील तरतुदनुसार पदोन्नत अधिकारी ३० दिवसांचे आत रूजू न झाल्यास सदरचे अधिकारी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ मधील तरतुदीनुसार शिस्तभंग विषयक कारवाईस पात्र राहतील. १५. उपरोक्त पदोन्नत अधिकाऱ्यांना कळविण्यात येते की, नवीन नियुक्तीच्या ठिकाणी रूजू झाल्याबाबतचा अहवाल revenue@maharashtra.gov.in या ई-मेलव्दारे/टपालाव्दारे शासनास त्वरीत कळवावे, असेही आदेशात सांगण्यात आले आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.