मतदार यादीमध्ये बोगस नावं कोणी टाकली? आरोपानंतर आमदार गायकवाडांचा धक्कादायक खुलासा

MLA Sanjay Gaikwad : आमदार गायकवाड यांच्या आरोपानंतर भाजप नेते प्रविण दरेकर यांनी गायकवाड यांना समज दिली पाहिजे असं म्हटलं होते. त्यानंतर आमदार गायकवाड यांनी मतदार यादीमध्ये बोगस नावे कोणी टाकली याबाबत मोठा खुलासा केला आहे.
MLA Sanjay Gaikwad
Buldhana MLA Sanjay Gaikwad exposes fake names in voter list; 4,000 duplicate entries spark political controversy across Maharashtra.saam tv
Published On
Summary
  • बुलढाणा शहराच्या मतदार यादीत तब्बल ४ हजार मतदारांची दोनदा नावे

  • मतदार यादीतील बोगस नावांबाबत आमदार संजय गायकवाड यांचा धक्कादायक खुलासा

  • महाराष्ट्रात मतदार यादीतील घोटाळ्याचा मुद्दा गाजतोय.

बुलढाणा शहरातील मतदार यादीतही बोगस नावे आहेत. शहराच्या मतदार यादीत किमान ४ हजार मतदारांचा घोळ आहे. ४ हजार नागरिकांची दोन वेळा नावे आहेत, असा आरोप करणाऱ्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी नवा धक्कादायक खुलासा केला आहे. मतदार याद्यांमध्ये बोगस नावे कोणी टाकली आहेत, याबाबत खुलासा केलाय.

MLA Sanjay Gaikwad
शिंदे गटाचा दणका;KDMC मध्ये भाजप आणि काँग्रेससह ठाकरे गटाला खिंडार; शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

मतदार यादीमधील घोळ पाहून राज्यातील विरोधी पक्ष नेत्यांनी आरोपांचा धुरळा उडवून दिलाय. विरोधकांसह सत्तेतील आमदारांनी त्यांच्या सुरात सूर मिसळला. मतदार याद्यांमधील घोळावरून त्यांनी निवडणुक आयोगावर सवाल केले होते. यातील प्रमुख नाव बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचे आहे.

MLA Sanjay Gaikwad
Voter List Scam: मतदारयांद्यामधील घोळावरुन विरोधक बरसले, निवडणूक आयोगाविरोधात 1 नोव्हेंबरला मोर्चा

एकट्या बुलढाणा शहराच्या मतदार यादीत किमान ४ हजार मतदारांचा घोळ आहे. तब्बल ४ हजार नागरिकांची दोन वेळा नावे असल्याचे गायकवाड म्हणाले होते. संजय राऊत आणि राज ठाकरे यांनी गायकवाड यांच्याच उदाहरणाचा दाखला देत निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले होते. आता शिंदे गट शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी मोठा खुलासा केला आहे.

दरम्यान मतदार याद्यांमधील घोळावरून प्रश्न केलेल्याने भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी त्यांना खडेबोल सुनावले होते. सत्तेमधील आमदारच बोलतोय, तर गायकवाड यांना समज द्यावी, असं म्हटलं होतं. त्याला उत्तर देताना आमदार गायकवाड म्हणाले, संजय गायकवाड यांना समज द्यावी, पण हे समजून घ्या ना. विरोधी पक्ष हे करतोय याचा अर्थ सत्ताधारी पक्ष आरोपीच्या पिंजऱ्यात आहे असं नाही. ही घाण आधीचीच आहे. ती आपण साफ केली पाहिजे.

सत्तेतला आमदार बोलतोय म्हणजे त्याने असं बोलू नाही असं नाही. मतदार यादी मध्ये बोगस नावही पंधरा-वीस वर्षाआधीची आहेत. त्यावेळी युतीचं सरकार नव्हतं. ही बोगस नावे त्याकाळी काँग्रेसच्या काही नेत्यांनी निवडून येण्यासाठी टाकलेली आहेत. बुलढाण्यातील निवडणूक विभागातील कर्मचाऱ्यांची नावे दोन ठिकाणी आहेत, मात्र ते स्वतःही त्यांची नावे डिलीट करू शकत नाहीत. असं गायकवाड म्हणाले आहेत.

निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. त्यांना निवडणूक लढवायची आहे का..? बोगस नाव ठेवण्यात निवडणूक आयोगाला काय स्वारस्य आहे. निवडणूक आयोग ज्यावेळी बैठक घेतो त्यावेळेस एकही अधिकारी बैठकीला उपस्थित नसतो, सर्व कंत्राटी कॉम्प्युटर ऑपरेटर असतात, ज्यांना काही काळत नाही. हे पैसे घेऊन नावे टाकतात का? असा सवाल गायकवाड यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com