Pune School Holiday News Saam Tv
मुंबई/पुणे

School Holiday : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, २३ जानेवारीला शाळांना सुट्टी; जाणून घ्या कारण

Pune School Holiday News : पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६ आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर २३ जानेवारी रोजी दुपारी १२ नंतर पुणे महानगरपालिकेतील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Alisha Khedekar

  • 23 जानेवारी रोजी पुण्यातील शाळा बंद

  • आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेमुळे निर्णय

  • दुपारी १२ नंतर सर्व सरकारी व खासगी शाळा बंद

  • वाहतूक कोंडी आणि विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आदेश

पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. महानगरपालिका हद्दीतील शाळा २३ जानेवारी रोजी दुपारी १२ नंतर बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी केले आहेत. पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६ आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या चौथ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय दुपारी १२ च्या आधी शाळा सुरु राहण्यास परवानगी असल्याचं पालिकेने म्हटलं आहे.

पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६ आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचा २३ जानेवारी रोजी चौथा टप्पा पार पडणार आहे. चौथ्या टप्प्याच्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व सरकारी व खाजगी शाळा बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र सरकारी व खाजगी शाळा २३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात याव्या आणि त्यांनतर शाळा बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत.

स्पर्धेचा चौथा टप्पा हा बालेवाडी ते बालगंधर्व रंगमंदिर या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेचे एकूण अंतर ५८ कि.मी आहे. त्यामुळे पुणे शहरातील होणारी वाहतूक कोंडी तसेच बहुतेक शाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्याच्यादृष्टीने आदेश जारी करण्यात आल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर तीन कंटेनरची धडक; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

घरमालक डिपॉझिट काही केल्या परत देत नाही, काय करावे? जाणून घ्या भाडेकरूंचे कायदेशीर अधिकार

Mobile Password: मोबाईलचा पासवर्ड विसरलात? सर्विस सेंटरला न जाता ‘या’ सोप्या ट्रिकने घरीच करा अनलॉक

Face Care: चेहरा फ्रेश दिसावा म्हणून रोज टॅल्कम पावडर लावता? मग, त्वचेवर होऊ शकतात हे ७ परिणाम

मोठी बातमी! मुंबई-पुण्यातील स्विमिंग पूल आणि बांधकामांवर निर्बंध येणार? मंत्री बावनकुळेंचे संकेत, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT