School Saam tv
मुंबई/पुणे

Pune Schools Holiday: मोठी बातमी! पुण्यातील १०१ शाळांना आठवडाभर सुट्टी, पुढच्या सोमवारी भरणार शाळा, नेमकं कारण काय?

Pandharpur Wari Live Updates : आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांच्या सोयीसाठी पुणे महापालिकेने १०१ शाळांमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे रविवारपर्यंत या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Akshay Badve

'ज्ञानबा-तुकाराम'च्या गजराने अवघी पुणे नगरी दुमदुमली असतानाच, प्रशासनाने माऊलींच्या लाडक्या वारकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. देहू-आळंदीतील पूरसदृश परिस्थिती लक्षात घेता, भाविकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून पुणे महापालिकेच्या १०० हून अधिक शाळांमध्ये त्यांच्या राहण्याची उत्तम सोय करण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या या विसाव्यासाठी पालिकेच्या १०१ शाळांना उद्यापासून रविवारपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

यासाठी पुणे महापालिकेच्या तब्बल १०१ शाळांना उद्यापासून थेट रविवारपर्यंत सुट्टी घोषित करण्यात आली असून, वारीच्या काळात या शाळा आता 'माऊलीं'चे तात्पुरते निवासस्थान असतील.

देहू आणि आळंदी परिसरात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने सुरक्षेचा उपाय म्हणून वारकऱ्यांची सोय पुण्यात करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांनी सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, सध्या निर्माण झालेली पूर परिस्थिती अत्यंत गंभीर असून प्रशासनाकडून त्यावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. अतिवृष्टीमुळे इंद्रायणी नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले असून देहू आणि आळंदी परिसरात वाहतुकीसह हालचालींवर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी वारकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे.

वारी १० जुलै रोजी पुण्यात दाखल होणार असून देहू आणि आळंदी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करण्याऐवजी वारकऱ्यांनी थेट पुण्यात यावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. सध्याच्या परिस्थितीत देहू किंवा आळंदी येथे जाणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे स्वतःच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वारकऱ्यांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. वारीसाठी राज्य शासनाने आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन वारकऱ्यांच्या निवारा, भोजन, वैद्यकीय सेवा आणि इतर आवश्यक सोयींचे नियोजन करण्यात आले असल्याचेही फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Injured: लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान प्रसिद्ध गायिकेवर हल्ला; चेहऱ्यावर गंभीर दुखापत

गर्लफ्रेंड बेस्ट फ्रेंडसोबत निघाली, उद्योगपतीनं कारच्या बोनेटवर उडी मारली; पुढच्याच क्षणी भंयकर घडलं अन् जागेवरच मृत्यू

Varanasi : आंतरराष्ट्रीय विमानतळावर गोळीबार! प्रवाशाची तपासणी करताना पिस्तुलातून गोळी सुटली; मोठा अनर्थ टळला

Pune News: पिंपळगाव जोगा धरणात पर्यटकांची स्टंटबाजी, थरकाप उडवणारा VIDEO समोर

Nag Panchami 2026: नागपंचमीला दारात काढण्यासाठी 5 सोप्या आणि सुंदर डिझाईन्स, जी पाहाल ती तुम्हाला आवडेल

SCROLL FOR NEXT