Shruti Vilas Kadam
सकाळी उठल्यानंतर अनेकदा चेहऱ्यावर किंवा डोळ्यांभोवती सूज दिसते. अशावेळी थंड कपड्याने शेक घेतल्यास सूज कमी होण्यास मदत होऊ शकते.
चेहऱ्यावर थंडावा दिल्यामुळे त्वचा काही वेळ फ्रेश दिसते. त्यामुळे थकलेला चेहरा ताजातवाना दिसण्यास मदत होते.
डोळ्यांभोवती हलकी सूज असल्यास थंड कपड्याने काही वेळ शेक घ्या. यामुळे डोळ्यांभोवतीचा फुगलेपणा कमी होऊ शकतो. मात्र, डोळ्यांवर थेट बर्फ लावू नका.
काही वेळा उन्हामुळे किंवा उष्णतेमुळे चेहऱ्यावर लालसरपणा येतो. अशावेळी थंड कपड्याचा हलका शेक दिल्याने त्वचेला आराम मिळू शकतो.
मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्यावर थंडावा दिल्यास त्वचा काही वेळ ताजीतवानी दिसते. मात्र, बर्फ लावल्यानंतर त्वचा पूर्णपणे कोरडी होऊ द्या.
उन्हातून घरी आल्यानंतर चेहऱ्यावर गरमपणा जाणवत असल्यास थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा. थंड कपड्याने हलका शेक घेतल्याने आराम मिळू शकतो.
बर्फाच्या थंडाव्यामुळे त्वचेतील उष्णता काही वेळ कमी झाल्यासारखी वाटते. त्यामुळे गरम वातावरणात चेहऱ्याला आराम मिळू शकतो.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.