Pune Saras Baug Entry Restricted Saam TV Marathi
मुंबई/पुणे

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! प्रसिद्ध 'सारसबाग' २ दिवस बंद! प्रशासनाचा मोठा निर्णय, कारण काय?

Pune Saras Baug Pune timings : पुण्यातील प्रसिद्ध सारसबाग आणि तळ्यातला गणपती मंदिर २८ आणि २९ मे रोजी बंद राहणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले.

Namdeo Kumbhar

सागर आव्हाड | पुणे प्रतिनिधी | साम टीव्ही मराठी

Pune Saras Baug Close : पुणेकरांच्या हक्काची जागा असलेली प्रसिद्ध 'सारसबाग' आणि सारसबागेतलं तळ्यातलं गणपती मंदिर पुढील दोन दिवस संपूर्णपणे बंद राहणार आहे. पुणे पोलिसांनी यासंदर्भात अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. २८ आणि २९ मे रोजी नागरिकांना बागेत प्रवेश करता येणार नाही. ऐन उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आणि वीकेंडच्या तोंडावर प्रशासनाने अचानक घेतलेल्या या मोठ्या निर्णयामुळे पुणेकरांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. पोलिसांनी अचानक सारसबाग बंद ठेवण्यामागे नेमकं काय कारण आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सारसबाग बंदचा पुणेकरांकडून निषेध

पुण्यातील प्रसिद्ध सारसबाग आणि 'तळ्यातलं गणपती मंदिर' दोन दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असला, तरी पुणेकरांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. सारसबाग २८ आणि २९ मे रोजी पूर्णपणे बंद राहील, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. मात्र, पुणे महानगरपालिकेचा मेंटेनन्स (दुरुस्तीचे काम) दररोज होत असताना, अचानक दोन दिवस बाग बंद करणे पूर्णपणे चुकीचे आहे, अशी भूमिका पुणेकरांनी घेतली आहे.

पुण्याच्या महापौरांनी सांगितले कारण

सुरक्षेच्या कारणास्तव सारसबाग उद्या आणि परवा पुणेकरांसाठी बंद करण्यात आली असल्याचे महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितले आहे. सुरुवातीला महापौरांनी 'दुरुस्तीचे कारण' देऊन मंदिर बंद राहणार अशी माहिती दिली होती. मात्र, त्यानंतर लगेचच पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार, सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर दोन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. प्रशासनाच्या या बदलत्या भूमिकेमुळे आणि गोंधळामुळे पुणेकरांमधून तीव्र निषेध व्यक्त होत आहे.

महापौर मंजुषा नागपुरे नेमकं काय म्हणाल्या ?

सारसबाग मंदिर २ दिवस बंद करण्याचा निर्णय हा पोलिसांनी घेतला आहे. मी फक्त महापौर म्हणून पुणेकरांना याबाबत माहिती दिली आहे. माझ्या सोशल मीडिया टीमकडून माहिती देताना चूक झाली. त्यांनी मंदिर डागडुजीसाठी बंद असल्याचं पोस्ट केलं, मात्र नंतर लक्षात आल्यानंतर चूक दुरुस्त केली. पोलिसांनी जी माहिती आम्हाला दिली, त्यानुसार मंदिर २८ आणि २९ तारखेला बंद ठेवण्यात येणार आहे. बकरी ईद आणि मंदिर बंद ठेवण्याचा काही संबध नाही. पोलिसांना काही माहिती मिळाली असेल म्हणून कायदा सुव्यवथा अबाधित राहावी म्हणून त्यांनी निर्णय घेतला असेल, माझी यात काही चूक नाही, असे मंजुषा नागपुरे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT