पुण्यामध्ये १८०० कोटींचा जमीन घोटाळा
जमीन घोटाळ्याप्रकरणी पार्थ पवारांवर गंभीर आरोप
पार्थ पवारांना शीतल तेजवानीने आणले अडचणीत
या प्रकरणी शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि रवींद्र तारू यांच्याविरोधात गुन्हा
पुण्यातील अमेडिया कंपनीला अडचणीत आणणाऱ्या शीतल तेजवानीसह ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमेडिया कंपनीवर १८०० कोटींचा जमीन घोटाळा केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. शीतल तेजवानी आणि तिच्या नवऱ्याने अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केली. पुण्यातल्या मुंढवा येथील हा जमीन घोटाळा समोर आल्यानंतर शीतल तेजवानीने केलेले एक एक कारनामे समोर येत आहे. अमेडिया कंपनीला सरकारी जमीन महार वतनाची जमीन म्हणून विकणारी शीतल तेजवानी आहे तरी कोण हे आपण जाणून घेणार आहोत...
शीतल तेजवानी पिंपरीची रहिवासी आहे. शीतल तेजवानी आणि त्याचा नवरा सागर सूर्यवंशी यांच्याविरोधातही याआधी फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. पिंपरी चिंचवड पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये सेवा विकास सहकारी बँकेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी शीतल तेजवानीच्याविरोधात गुन्हे दाखल आहे. शीतल तेजवानीच्या विरोधात सीआयडी आणि ईडीकरडूनही याआधी कारवाई केली आहे. शीतल तेजवानीला सेवा विकास सहकारी बँकेच्या फसवणूक प्रकरणी अटकही झाली होती. शीतल तेजवानीच्या विरोधात याआधीचे शेतकऱ्यांचे फसवणूक केल्याचे दोन गुन्हे दाखल आहेत. आता बावधन पोलिस ठाण्यामध्ये जमीन फसवणूक केल्याप्रकरणी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमेडिया कंपनीला अडचणीत आणणाऱ्या शीतल तेजवानीचा आणखी एक धक्कादायक कारनामा उघडकीस आला आहे. शीतल तेजवानी आणि तिचा पती सागर सूर्यवंशी या दोघांनी मिळून पिंपरी चिंचवड शहरातील दी सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँक मधून जवळपास ४१ कोटी रुपयांचे बनावट कर्ज घेतलं होतं. महागड्या गाड्या आणि लॉन टाकण्याच्या नावावर दी सेवा विकास बँकेच्या वेगवेगळ्या शाखामधून ४१ कोटी रुपयांचं कर्ज शीतल तेजवानी आणि सागर सूर्यवंशी यांनी घेऊन बँकेची फसवणूक केली होती. या प्रकरणात शीतल तेजवानी आणि तिच्या पती सागर सूर्यवंशी या दोघांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून शीतल तेजवानी फरार आहे. बावधन पोलिसांकडून तिचा शोध सुरु आहे. शीतलने जमीन व्यवहारासाठी वापरलेल्या कुलमुखत्यार पत्रासाठी जो पत्ता वापरला त्या परामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला सध्या टाळे आहे. त्यामुळे बावधन पोलिसांसमोर शीतलचा शोध घेण्याचं आव्हान आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.