PUNE ROBBERY CASE: FATHER-IN-LAW AND SON-IN-LAW ARRESTED FOR ₹6.5 LAKH LOOT OF TRADER Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : पुण्यात खळबळ! सासरा आणि जावयाने मिळून व्यापाऱ्याला लुटलं; सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलीसही चक्रावले

Pune News : पुण्यातील ६.५ लाखांच्या लुटीप्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. व्यापाऱ्याकडे काम करणाऱ्या सासऱ्याने जावयासोबत कट रचून लूट केल्याचे तपासात उघड झाले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

Akshay Badve

  • पुण्यात सासरा आणि जावयाने मिळून व्यापाऱ्याला लुटले

  • पोलिसांनी आरोपींना अटक केली

  • कर्जबाजारीपणामुळे सासरा, जावई आणि त्यांच्या साथीदाराने लुटीचा कट रचल्याचे तपासात समोर

  • पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू

पुण्यात सासरा आणि जावयाच्या जोडीने मिळून चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कर्जबाजारी झालेल्या सासरा आणि जावयाने मिळून व्यापाऱ्याचे ६.५ लाख रुपये लुटल्याचे तपासात समोर आले. विशेष म्हणजे व्यापाऱ्याकडे काम करत असल्याने सासऱ्याला सगळी खबर होती. त्यानेच ही माहिती जावयाला दिली आणि दोघांनी व्यापाऱ्याचे पैसे लुटले. ९ जुलै रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हर्ष रेसिडेन्सी परिसरात ही घटना घडली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास करत दोघांना अटक केली. या प्रकरणी ६९ वर्षीय व्यापाऱ्याने स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार फिर्यादी राहत असलेल्या इमारतीजवळ घडला. फिर्यादी हे स्वतः व्यापारी असल्यामुळे दररोजच्या व्यवहारातून त्यांनी पैशाची बॅग घेऊन घरी निघाले होते. ९ जुलै रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे त्यांच्या सोसायटीच्या गेटवर आले असता सोसायटीचा वॉचमन चंद्रासिंग हा त्याच्या हातामध्ये फिर्यादी यांची बॅग घेवुन त्यांच्या सोबत गेटमधुन आत जात होता. यावेळी अचानक त्याच्या पाठीमागुन पायी चालत आलेल्या व्यक्तीने वॉचमनच्या हातातील बॅग हिसकावुन चोरी करुन पसार झाला.

वॉचमनने त्याच्या मागे धाव घेतली मात्र पुढे काही अंतरावर थांबलेल्या या व्यक्तीचा साथीदार दुचाकी घेऊन तयार होता. तिथून या दोघांनी धूम ठोकली. हातातून बॅग ओढलेल्या व्यक्तीने पावसाचे काळे जॅकेट घातल्यामुळे त्याची ओळख पटली नव्हती. स्वारगेट पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करत असताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि गोपनीय माहितीच्या आधारे तीन जणांची नावं निष्पन्न केली आणि यातील जयंत रजनीकांत शहा आणि सोहेल अली खान यांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतल्यावर पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली. पोलिसी खाख्या दाखवताच या दोघांनी हे कृत्य केल्याचं कबूल केलं. सोहेल हा शहा यांचा जावई, दोघे ही कर्जबाजारी झाल्यामुळे त्यांनी हे कृत्य केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. विशेष म्हणजे शहा हे फिर्यादी यांच्याकडे अनेक वर्षांपासून काम करत होते आणि यामुळे त्यांना फिर्यादी यांच्या प्रत्येक हालचालींबद्दल माहिती होती. शहा यांनी जावई सोहेल याला त्याच्या मित्रासोबत हे कृत्य करण्यास सांगितलं असं तपासातून आता समोर आलं आहे सोहेल अली खान (जावई) त्याचा मित्र तौसिफ मुकिद बागवान आणि जयंत रजनीकांत शहा (सासरा) या तिघांना आता पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NEET पेपरफुटी प्रकरणी एकापेक्षा एक खळबळजनक खुलासे, CBI च्या चार्जशीटमध्ये नेमके काय?

Mumbai Local Train : रेल्वे प्रवाशांनो, रविवारी वेळापत्रक बघूनच बाहेर पडा; मध्य रेल्वेवर फास्ट ट्रेनचे थांबे बदलणार, हार्बरवर काही लोकल रद्द

Bollywood Actor Hospitalized: ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्याची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया

Maharashtra News Live Update: जळगावात दहावीच्या विद्यार्थ्यावर चॉपरने प्राणघातक हल्ला

Nashik: देवळा-मालेगाव रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वार दोघांचा जागीच मृत्यू, कारचालक फरार

SCROLL FOR NEXT