Pune Accident Saam tv
मुंबई/पुणे

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात; भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, दोघांचा जागीच मृत्यू

Pune Accident News : पुण्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली. भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला.

Vishal Gangurde

पुण्यातील हांडेवाडी मंतरवाडी मार्गावर भीषण अपघातात .

सिमेंट मिक्सर ट्रक दोघांच्या अंगावरून गेला

संतोष कांबळे आणि सदाशिव फुलावळे अशी मृतांची नावे

ट्रक चालक नागेश कोरडे याला पोलिसांकडून अटक

सचिन जाधव, साम टीव्ही

Pune Fursungi Accident: पुण्यात अपघाताची मालिका सुरुच आहे. पुण्यात हांडेवाडी मंतरवाडी मार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली. हांडेवाडी मंतरवाडी मार्गावर मंगळवारी सकाळी अपघात झाला. या सिमेंट मिक्सर ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

पुण्यात हांडेवाडी मंतरवाडी मार्गावर एचपी पेट्रोल पंपासमोर काल सकाळी ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला. पुण्यातील फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी सिमेंट मिक्सर ट्रक चालकाला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

संतोष प्रल्हाद कांबळे ( वय ४९ रा. हांडेवाडी रोड मुळगाव अहिल्यानगर ), सदाशिव गोरख फुलावळे ( वय ३६,रा.उरुळी देवाची ) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वारांची नावे आहेत. तर पोलिसांनी नागेश नाना कोरडे ( वय ३५ रा.उफळाई, ता. म्हाडा सोलापूर ) या ट्रक चालकाला अटक केली आहे.

अपघात नेमका कसा झाला?

मृत संतोष आणि सदाशिव हे दोघे दुचाकीवरून हांडेवाडीकडून मंतरवाडीच्या दिशेने जात होते. एचपी पेट्रोल पंपासमोर त्यांची दुचाकी घसरली. त्यावेळी दोघेही मागवून येणाऱ्या सिमेंट मिक्सर ट्रकने धडक दिल्याने दुचाकी एका बाजूला पडली. त्यामुळे दुसऱ्या बाजूला पडलेल्या दोघांच्या अंगावरून ट्रक गेल्याने दोघांचा जागीच मृत्य झाला. अपघातानंतर पोलिसांनी सिमेंट मिक्सर ट्रक चालक नागेश नाना कोरडे याला ताब्यात घेण्यात आलं. अपघातानंतर पोलिसांनी तातडीने ट्रक चालकावर अपघात प्रकरणी गुन्हा नोंदवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics : मोठी राजकीय घडामोड! बड्या नेत्याने पक्षातून केली मुलीची हकालपट्टी

Manoj jarange patil protest live updates: मंचरमध्ये एकमेकाला लाडू भरवून मराठा आंदोलकांनी साजरा केला आनंदोत्सव

Frequent Urination: आरोग्याचा इशारा! ही सात लक्षणे टाळू नका, योग्य तपासणी लगेचच करा

Maratha Reservation GR: मराठा आरक्षण GR चा राज्यात फायदा? पाहा मंत्री गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले? VIDEO

Horoscope Wednesday : ४ राशींसाठी बुधवार जाणार खास, वाचा संपूर्ण राशीभविष्य

SCROLL FOR NEXT