Pune Ring Road Project Saam Tv
मुंबई/पुणे

पुणेकरांसाठी खुशखबर! वाहतूक कोंडीचा त्रास कमी होणार, रिंग रोड प्रकल्पाबाबत आली मोठी अपडेट

Pune Ring Road Project : एमएसआरडीसीने रिंग रोड प्रकल्पाचे बांधकाम औपचारिकरित्या सुरु केले आहे. हा प्रकल्प अंमलबजावणीच्या टप्प्यात आला आहे. रिंग रोड प्रकल्पाशी संबंधित नवी माहिती समोर आली आहे.

Yash Shirke

पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच एमएसआरडीसीद्वारे पुण्यातील रिंग रोड प्रकल्पाचे बांधकाम औपचारिकरित्या सुरु करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बांधकामाचे भूमिपूजन होईल असे ठरले होते. पण भूमिपूजनाशिवायच या प्रकल्पाची सुरुवात झाली.

पुणे रिंग रोड प्रकल्प आता अंमलबजावणीच्या टप्प्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नऊ बांधकाम कंपन्यांना कंत्राट देण्यात आले आहे. अनेक ठिकाणी प्रत्यक्ष काम सुरु झाले आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये रिंग रोड प्रकल्पाचे पहिले कंत्राट देण्यात आले होते, तर शेवटचे कंत्राट जानेवारी २०२५ मध्ये दिले गेले.

एमएसआरडीसीचे पुणे विभागाचे मुख्य अभियंते राहिल वसईकर यांनी प्रकल्पाची माहिती दिली. ते म्हणाले, रिंग रोडच्या सर्व नऊ विभागांमध्ये बांधकाम एकाच वेळी सुरु झाले आहे. यामध्ये वडेबोल्हाई, खडकवासला, सिंहगड, मुळशी, उर्से, चाकण, हिंजवडी आणि सोरतापवाडी या ठिकाणांचा समावेश आहे.

रिंग रोड प्रकल्पासाठी भूसंपादनाचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. पश्चिम विभागासाठी आवश्यक असलेल्या सुमारे ९९ टक्के आणि पूर्व विभागासाठी ९८ टक्के जमीन संपादित करण्यात आली आहे. १६९ किलोमीटर लांबी आणि ११० मीटर रुंदी असलेल्या पुणे रिंगरोड प्रकल्पासाठी अंदाजे ४२,७११ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

'महाराष्ट्र सरकारसोबत करारबद्ध झालेल्या कंपन्याना कामाचे आदेश देण्यात आले आहेत. कायदेशीर मंजुरी मिळाल्यापासून अडीच वर्षांच्या आत बांधकाम पूर्ण करावे लागेल असे करारात नमूद करण्यात आले आहे. जमीन सपाटीकरण, नदी आणि ओढ्यांवर पूल बांधणे आणि माती भरणे यासारखी सुरुवातीची कामे सध्या सुरू आहेत. पावसाळ्यामुळे काही कामे तात्पुरती थांबू शकतात, पण काम ठरलेल्या वेळापत्रकानुसार सुरु राहील', असे राहिल वसईकर यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT