Pune News saam tv
मुंबई/पुणे

सरकार आमच्या मरणाची वाट पाहत आहे काय सेवानिवृत्तीनंतरही शिक्षकाचे प्राणांतिक उपोषण सुरुच

Pune News : पूर्णवेळ वेतननिश्चिती करावी; पूर्णवेळ वेतन, सेवानिवृत्ती वेतन मिळावे या मागणीसाठी प्राध्यापक दिलीप ठोंबे उपोषण करत आहेत. शिक्षण संचालक कार्यालयासमोर प्राध्यापक ठोंबे यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम झाला.

Yash Shirke

सागर आव्हाड, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुणे : पुण्यात महाराष्ट्र राज्याच्या उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर प्राध्यापक दिलीप ठोंबे त्यांच्या कुटुंबासह धरणे आंदोलन आणि उपोषण करत आहेत. पूर्णवेळ वेतननिश्चिती केली जावी, पूर्णवेळ वेतन मिळावे, सेवानिवृत्ती वेतन मिळावे अशी त्यांची मागणी आहे. प्राध्यापक दिलीप ठोंबे आज (३० मे) सेवानिवृत्त होत आहेत. सेवानिवृत्तीच्या दिवशी देखील ठोेंबे यांचे आंदोलन सुरु आहे. त्याचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रमही संचालक कार्यालयासमोर संपन्न झाला. प्राध्यापक संघटनेद्वारे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

प्राध्यापक दिलीप ठोंबे हे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील आबासाहेब काकडे कला महाविद्यालयात सन १९९९ पासून प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. शासन निर्णयानुसार त्यांच्या नियुक्तीपासून त्यांचा कार्यभार पूर्णवेळ असून, विद्यापीठाने त्यांना पूर्णवेळ कायमस्वरूपी मान्यता दिली आहे. पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाने २००६ व २०११ च्या अनुदान निर्धारण अहवालांमध्येही त्यांना पूर्णवेळ मान्यता दिलेली आहे. तसेच, उच्च न्यायालयानेही त्यांच्या बाजूने निर्णय दिला आहे.

२९ जानेवारी २०२५ रोजी मुंबईत उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत, पाटील यांनी या प्रकरणात उच्च न्यायालयाचा आदेश असल्यामुळे सद्सद्विवेक बुद्धीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे सांगितले होते. त्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आठ दिवसांत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आदेश उच्च शिक्षण विभागाला दिले होते. मात्र, अद्यापही उच्च शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी हा प्रश्न प्रलंबित ठेवलेला आहे.

विभागीय सहसंचालक कार्यालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि त्यांच्या महाविद्यालयातील प्रा. बाळासाहेब बनसोडे यांच्याप्रमाणे समान न्याय तत्वानुसार व सद्सद्विवेक बुद्धीने तात्काळ निर्णय घ्यावा, अशी विनंती प्राध्यापक ठोंबे यांनी केली आहे.

दिलीप ठोंबे यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात आंदोलन करून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी प्राध्यापक ठोंबे भावुक झाले. त्यांच्या पत्नीने सरकारला सवाल केला की, “आम्हाला न्याय माणूस गेल्यानंतरच मिळणार आहे का? आणि जेव्हा ते पैसे मिळतील, तेव्हा त्याचा उपयोग आमच्यासाठी काय? जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत या ठिकाणाहून उठणार नाही."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आगामी महानगरपालिका निवडणूकिच्या पार्श्वभूमीवर सोलापूर भाजपमध्ये जम्बो पक्षप्रवेश

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT