Rajgurunagar Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: पुणे जिल्हा हादरला! ड्रग्जचं इंजेक्शन देऊन २ अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Rajgurunagar News: महाराष्ट्र हादरवणारी घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे. राजगुरुनगर शहरात दोन अल्पवयीन मुलींना ड्रग्जचं इंजेक्शन देऊन त्यांच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

रोहिदास गाडगे

Rajgurunagar Crime News:

महाराष्ट्र हादरवणारी घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे. राजगुरुनगर शहरात दोन अल्पवयीन मुलींना ड्रग्जचं इंजेक्शन देऊन त्यांच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ड्रग्ज पुरवठा करणारा आणि अत्याचार करणाऱ्या दोघांवर राजगुरूनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील एक आरोपी अल्पवयीन आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली असून, एक जण फरार आहे.

पीडित मुली नशेत घरी पोहोचल्यानंतर ही संतापजनक घटना उघडकीस आली आहे. दोन्ही पीडित मुलींना ड्रग्जचे इंजेक्शन दिले होते. तसेच त्यांना दारूही पाजली होती. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेत त्यांना लॉजवर नेऊन तिथे अत्याचार करण्यात आला. अत्याचारपीडित दोन्ही मुली अल्पवयीन आहेत.

राजगुरूनगर शहरात घडलेल्या या घटनेने पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणात अंमली पदार्थांचा पुरवठा करणारा आणि अत्याचार करणाऱ्या दोघांवर राजगुरूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यातील एक आरोपी हा अल्पवयीन आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर एक आरोपी फरार आहे.

सांगलीत कॅफे शॉपमध्ये अश्लील चाळे

दरम्यान, आज सांगलीत एका कॅफेमध्ये अश्लिल चाळे होत असल्याचा आरोप करत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान संघटनेने तोडफोड केली. यामुळे परिसरात काही कला तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या कॅफे शॉपमध्ये अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध पाजून अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला आला होता.

याविरोधात कोणतीही कारवाई न झाल्याने हिंदुस्तान संघटना आक्रमक झाली. याप्रकारानंतर शिवप्रतिष्ठानच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगडच्या कर्जत आणि खालापूर तालुक्यात जोरदार पाऊस

Pune Fort : पुण्याजवळ दडलाय इतिहासाचा खजिना! दोन डोंगरांवर वसलाय भव्य किल्ला

Solapur drought : १०० एकर जमिनीचा मालक, पण लग्नासाठी पोरगी मिळेना! सोलापूरमधील तरुणांची भीषण शोकांतिका

Betel Nut : दातांमध्ये सुपारीचा तुकडा अडकलाय? वापरा 'ही' १ ट्रिक, सेकंदात दुखणे होईल दूर

Good News: आणखी एक वंदे भारत स्लीपर धावणार! २ महत्त्वाच्या शहरांना जोडणार; जाणून घ्या 'A टू Z' माहिती

SCROLL FOR NEXT