Shreya Maskar
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दातांमध्ये अडकलेली सुपारी तुम्ही 'वॅक्ड डेंटल फ्लॉस' (waxed dental floss) आणि कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या करून सुरक्षितपणे काढू शकता.
कोमट पाण्यात मीठ मिसळा आणि अडकलेला तुकडा सैल करण्यासाठी ते पाणी तोंडात फिरवा. २-३ मिनिटांत दातात अडकलेला तुकडा पडून जाईल.
सुपारीचा तुकडा पकडून बाहेर काढण्यासाठी तो मेण लावलेला धागा (वॅक्ड स्ट्रिंग) हळूच दातांच्या मध्ये सरकवा, काही सेकंदात अडकलेला तुकडा बाहेर येईल.
तुमच्याकडे पाण्याचा फवारा मारणारे वॉटर फ्लॉसर यंत्र असल्यास त्याचा वापर करा. पाण्याच्या तीव्र धारेमुळे दातांमधील कडक कण सहज निघून जातात.
टूथपिक अत्यंत हळुवारपणे दातांच्या फटीत सरकवून तुकडा बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करा. लाकडी टूथपिकचा वापर करा.
तीक्ष्ण धातूची साधने वापरू नका (सुई, सेफ्टी पिन, टाचणी, कात्री किंवा धातूच्या वस्तूं) यामुळे हिरड्यांना जखम होऊ शकते.
जर तुकडा खूप आत अडकला असेल, तर जबरदस्तीने तो काढण्याचा प्रयत्न करू नका, यामुळे तो आणखी आत जाऊ शकतो. त्वरित डॉक्टरांकडे जा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.