Maharashtra Politics: राज्यात मोदी - अमित शहा यांच्यापेक्षा फडणवीसांविरोधात मोठी लाट: संजय राऊत

Sanjay Raut News: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यापेक्षा राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोठी लाट आहे. तसेच महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे मोठे नुकसान केले आहे: संजय राऊत
राज्यात मोदी - अमित शहा यांच्यापेक्षा फडणवीसांविरोधात मोठी लाट: संजय राऊत
Sanjay Raut On Devendra FadnavisSaam Tv

Sanjay Raut On Devendra Fadnavis:

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यापेक्षा राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोठी लाट आहे. तसेच महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे मोठे नुकसान केले आहे, असं म्हणत ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. माध्यमांशी संवाद साधताना राऊत असं म्हणाले आहेत.

ते म्हणाले आहेत की, ''महाराष्ट्रात नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याविरोधात एक लाट आहे. त्यापेक्ष जास्त मोठी लाट ही देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचं सर्वात जास्त नुकसान देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे होत आहे. लोक त्यांचा तिरस्कार करतात, हे 4 जूनला कळेल.''

राज्यात मोदी - अमित शहा यांच्यापेक्षा फडणवीसांविरोधात मोठी लाट: संजय राऊत
Pune News: उद्धव ठाकरेंना पुण्यात धक्का! युवासेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; पदांसाठी पैशांची मागणी झाल्याचा आरोप

राज ठाकरे यांच्यावर निशाणा सांधता संजय राऊत म्हणाले आहेत की, ''या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील काही दुकाने सुपारीची बंद होणार. त्यातील राज ठाकरे एक दुकान आहेत. तीन चार सुपारी शोप इन पॉलिटिक्स बंद होणार आहे. त्यातीलच एक हे दुकान आहे.''

ते म्हणाले, ''प्रधानमंत्री मुंबईत येऊन इतक्या सभा घेतात, म्हणजे तुम्ही दहा वर्षात काही केलं नाही, असं म्हणता येईल. ज्यांनी तुम्हाला शिव्या घातल्या त्यांना मांडीवर घेऊन बसावे लागले नसते. राज ठाकरे ज्यांच्याबद्दल सवाल उठवतात त्यांच्याबरोबरच जातात ही राज ठाकरे यांची खासियत आहे.''

राज्यात मोदी - अमित शहा यांच्यापेक्षा फडणवीसांविरोधात मोठी लाट: संजय राऊत
Manoj Jarange Patil Health: मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली; दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल

दरम्यान, राऊतांच्या टीकेला भाजप आमदार नितेश राणे यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले आहेत की, ''उद्धव ठाकरे यांच्या आजच्या या अवस्थेला संजय राऊतच कारणीभूत आहेत.'' राणे म्हणाले, यांनी जेवढे उद्धव ठाकरे यांचे हाल आणि नुकसान केले आहे, तेवढे कुठल्याच शिवसैनिकांनी केलेले नाही.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com