Rajgad Fort Tragedy  Saam Tv
मुंबई/पुणे

Shocking : राजगडावर चढताना धाप लागली अन् खाली कोसळला, २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Rajgad Fort Tragedy News : राजगड किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या २१ वर्षीय युवकाचा किल्ला चढताना हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. वेल्हे पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • सलग सुट्ट्यांमुळे राजगड किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होती

  • बेळगाव तालुक्यातील २१ वर्षीय युवकाचा किल्ला चढताना मृत्यू

  • छातीत दुखणे, उलटी व बेशुद्धावस्थेनंतर कोसळल्याची माहिती

  • वेल्हे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले

सागर आव्हाड, पुणे

राज्यात सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे नागरिक फिरण्याचा मनमुराद आनंद लुटत आहे. २३ जानेवारीपासूनच पर्यटन स्थळांवर ठिकठिकाणी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. अशातच किल्ले राजगड येथे पर्यटनासाठी आलेल्या बेळगाव तालुक्यातील २१ वर्षीय युवकाचा किल्ला चढताना दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी साडेअकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास घडली. प्राथमिक अंदाजानुसार हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याची माहिती वेल्हे पोलिसांनी दिली.नागराज गुरू कोरी (वय.२१) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागराज चार मित्रांसह किल्ले येथे पर्यटनासाठी काल सकाळी आला असता गुंजवणे मार्गे किल्ला सर करत गुंजवणे दरवाजा जवळ आल्यानंतर, त्याला धाप लागून त्याच्या छातीत दुखू लागले. दरम्यान काही वेळ थांबल्यानंतर तो पुन्हा किल्ला चढू लागला. त्यावेळी मात्र त्याच्या छातीत पुन्हा दुखू लागले आणि उलटी होऊन तो बेशुद्ध पडला.

यावेळी सोबतच्या मित्रांनी 112 नंबरवर संपर्क साधल्यानंतर वेल्हे पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सोमेश राऊत यांनी किल्ल्यावर असणाऱ्या पुरातत्व विभागाच्या कर्मचारी विशाल पिलावरे यांच्याशी संपर्क साधला. विशाल याने प्रकाश ढेबे याच्यासह गडावर असलेले पर्यटक युवराज पाटील, अनिकेत पासलकर ,समीर कामठे, गणेश दीक्षित यांच्या सहाय्याने स्ट्रेचरवरून नागराज यास गडाच्या खाली आणले.

यावेळी खाली उपस्थित असलेल्या हवलदार राऊत यांनी नागराज यास तात्काळ वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले. दवाखान्यांमध्ये उपस्थित असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर हिरास यांनी तपासणी केली असता दवाखान्यात येण्यापूर्वी नागराजचा मृत्यू झाला असल्याची माहिती दिली. दरम्यान वेल्हे पोलीस ठाण्याचे हवालदार सोमेश राऊत अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

SCROLL FOR NEXT