Pune Train Update  Saam tv
मुंबई/पुणे

Pune Train Update : पुण्यात पावसाचा हाहा:कार; मुंबईला उद्या जाणाऱ्या डेक्कन क्विनसहित ३ रेल्वे गाड्या रद्द, पर्यायी मार्ग काय?

Pune Train Update News : पुण्यात पावसाने हाहा:कार माजवला आहे. मुंबईला उद्या जाणाऱ्या डेक्कन क्विनसहित ३ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. पर्यायी मार्ग काय? जाणून घेऊयात.

Vishal Gangurde

पुणे : पुण्यात पावसाने दाणादाण उडवली आहे. पुण्यातील पावसाने रौद्ररुप धारण केलं आहे. मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. शहरातील सखल भागात कमरेइतकं पाणी साचलं आहे. या प्रचंड पावसामुळे पुणे जलमय झालं आहे. या कोसळधार पावसाचा रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे. पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या ३ रेल्वे शुक्रवारी रद्द करण्यात आल्या आहेत.

पुण्यात मुसळधार पावसाने साऱ्यांची तारंबळ उडवली आहे. जोरदार पावसामुळे मुंबईला जाणाऱ्या ३ रेल्वे गाड्या रद्द झाल्या आहेत. मुंबईला जाणाऱ्या डेक्कन क्विन, प्रगती एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्यातून उद्या मुंबईला जाणाऱ्या सकाळच्या सत्रातील रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईला जाणाऱ्या महत्वाच्या ३ गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांपुढे मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या आणि मुसळधार पावसामुळे ३ गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बससेवा सुरुच असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईला जाणाऱ्या ३ रेल्वे गाड्या बंद असल्यामुळे एसटी बस सेवेवर ताण येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पुण्यातील अनेक ब्रीज पाण्याखाली

मुसळधार पावसामुळे पुणे महापालिका हद्दीतील काही पूल पाण्यााखाली गेले आहेत. तर मुसळधार पावसामुळे काही ब्रीज बंद करण्यात आले आहेत. पुणे महानगरपालिका हद्दीत बालेवाडी ब्रीज, मुळा नदी ब्रीज, संगम रोड ब्रीज, होळकर ब्रीज, संगमवाडी ब्रीज, महर्षी शिंदे ब्रीज, हडपसर- मुंढवा रोड ब्रीज, मातंग ब्रीज, येरवडा शांतीनगर येथील ब्रीज,निंबजनगर ब्रीज, मोई, आणि चिकली रस्त्यावरील इंद्रायणी पूल पावसामुळे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वाहतुकीसाठी हे ब्रीज बंद करण्यात आले आहेत.

पुण्यातील शाळांना सुट्टी

पुणे शहर आणि जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करा, असे पत्र मंत्री चंद्रकांत पाटील यांना पुणे जिल्हाधिकाऱ्यांना केली होती. मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पुणे शहर आणि पिंपरी-चिंचडव शहरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाकडून उद्याही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त ऐश करत आहेत; सुट्ट्या काढून पळाले सगळे – बच्चू कडू संतापले|VIDEO

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री धन्वंतरी रूपात अलंकारिक पूजा

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

SCROLL FOR NEXT