Pune rain news  saam tv
मुंबई/पुणे

Pune Rain | पुण्यात पावसाची तुफान बॅटींग; जिल्ह्याच्या चारही धरणातील पाणीसाठ्यात वाढ

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून पावसाने पुण्यात सपाटाच लावला आहे.

साम टिव्ही ब्युरो

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

Pune Rain News : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून पावसाने पुण्यात सपाटाच लावला आहे. पुण्यातील धरणसाखळीतही तुफान पाऊस सुरू आहे. त्यामुळे गेल्या २४ तासांत खडकवासला धरणसाखळीत दोन टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. तसेच इतरही धरणक्षेत्राच चांगला पाऊस (Rain) पडला आहे. त्यामुळे या मुसळधार पावसामुळे पुणेकरांची (Pune) पाण्याची चिंता मिटण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात पावसांची तुफान बॅटिंग सुरू आहे. पुण्यातील धरण क्षेत्रातही तुफान पाऊस कोसळला आहे. त्यात गेल्या २४ तासांत खडकवासला धरणसाखळीत दोन टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. मंगळवार सकाळपासून ते बुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंत खडकवासला येथे १४ मिलीमीटर पाऊस झाला. तर दुसरीकडे पानशेत व वरसगाव येथे अनुक्रमे ९० व १०० मिलीमीटटर पाऊस झाला आहे. त्याचबरोबर टेमघर येथे सर्वाधिक म्हणजे १६० मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यात तुफास पाऊस पडल्याने खडकवासला धरण आज १.०७ टीएमसी म्हणजे ५४.२१ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर पानशेत धरणात आज सकाळी सहा वाजता ९.८८ टीएमसी म्हणजे ९२.७८ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्याचबरोबर वरसगाव धरणात आज १०.८३ टीएमसी म्हणजे ८४.५१ टक्के पाणीसाठा झाला आहे. तसेच टेमघर धरणात आज २.५० टीएमसी म्हणजे ६७.४४ टक्के पाणीसाठा झाला आहे. या चारही धरणात २४.२९ टीएमसी ८३.३२ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma: रोहित शर्माच्या घरी आला 'ज्युनिअर हिटमॅन', रितिकाने दिला मुलाला जन्म

Maharashtra Rain :थंडीची प्रतीक्षा कायम! ८ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Assembly Election: अब्दुल सत्तारांना पाडण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद; ठाकरे आणि भाजपची युती?

Assembly Election: राज्यात जातीवर आधारित मतदान नाही; अजित पवारांच्या विधानाने महायुतीला टेन्शन

Horoscope: जुन्या मित्रांची होईल भेट, जोडीदाराचा सुटेल अबोला; जाणून घ्या तुमची राशीत आहे काय?

SCROLL FOR NEXT