भंडारा : अति घाई संकटात नेई या उक्तिची प्रचिती भंडारा जिल्ह्यात आली. अति शहानपण करत वाहत्या मार्गावरुन एका कार चालकाला चांगलेच महागात पडले आहे. अचानक पाण्याचा प्रवाह आल्याने कार पाण्यात (Bhandara) तरंगत वाहू लागली होती. परंतु, नागरीकांच्या प्रसंगावधानाने कारमधील नागरीकाचे प्राण वाचले आहेत. (Bhandara News Heavy Rain)
भंडाऱ्यात अतिवृष्टिने हाहाकार माजविला असुन जिल्ह्यातील सातही तालुक्यात अतिवृष्टिचा (Heavy Rain) कहर पहायला मिळत आहे. चौफेर नजर फिरविली की रस्त्यावर शेतात, घरात पाणीच पाणी दिसू लागले आहे. यामुळे जिल्ह्यात 45 गावमार्ग बंद असून मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. तर जिल्ह्यातील 170 घरे क्षतिग्रस्त झाले आहे.
नशीब बलबत्तर म्हणून..
मोहाडी शहरात चंडेश्वरी मंदिराजवळील मार्गावर लागलेला नाल्यातुन पुराचे पाणी वाहत असल्याने नाल्यालगतचा रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दरम्यान हा रस्त्या पार करत असताना अचानक पाण्याच्या प्रवाह वाढल्याने कार पाण्यात तरंगु लागली. वेळीच दोन लोक कारसह वाहून जाणार तोच लोक मदतीला धाउन येत वाहती कारला पकडून ठेवल्याने कारसह दोन लोकांना प्राण वाचले आहे. नसीब बलवत्तर होते म्हणून कार मधील दोन्ही लोक बचावले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.