Pune Rain Viral Video Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Rain: पुणेकरांवर आभाळ फाटलं! अनेक भागात ढगफुटीसदृष्य पाऊस; वाहने गेली वाहून, पाहा VIDEO

Pune Rain Viral Video: पुण्यामध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला आहे. रस्त्यावरुन गाड्या वाहून गेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Rohini Gudaghe

पुण्यात पहिल्याच पावसाने पुणेकरांची मोठी तारांबळ उडाली आहे. शहराच्या अनेक भागांत ढगफुटीसदृष्य पाऊस झाला आहे. त्यामुळे रस्त्यांना नद्याचं स्वरूप प्राप्त झालं आहे. रस्त्यांवरून गाड्या वाहून गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. पुणेकरांची मोठी धांदल उडाल्याचं पाहायला मिळत आहे.

पुण्यातील अनेक भागांत रस्त्यावर पाणी साचलं आहे. त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांना मार्ग काढणं अवघड बनलं आहे. अनेक ठिकाणी पावसामध्ये अनेक दुचाकी अडकून पडल्याचं दिसत (Pune Rain) आहे. शहरात गटारी तुंबल्या आहेत, तर अनेक घरांमध्ये पाणी साचल्याचं दृश्य समोर आलेलं आहे. पाण्यात चालकासहित दुचाकी वाहून गेल्याची घटना समोर आली आहे.

पुणे शहरात काल झालेल्या पावसाने पुणेकरांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत. अनेक भागात अजूनही पाणी जमा (Pune News) आहे. पुण्यातील रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या सबवेमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाल्याने प्रवाशांना या पाण्यातून जावं लागत आहे. तर अनेक दुकानदारांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. रिक्षात पाणी आणि दुचाकी पाण्यात गेल्या आहेत. तर शहरात गटारी तुंबल्या (Pune Rain Viral Video) आहेत.

पुण्यात अनेक भागात मुसळधार पाऊस सुरूच आहे. घोरपडी, कात्रज, लोहगाव सिंहगड रस्ता परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. रस्त्यावर पाणी साचलं (Cars Drifted Off Road VIDEO) आहे. पुणे शहरात जोरदार पाऊस झाल्याचं समोर आलं आहे. रस्त्यावर ड्रेंनेज लाईन फुटल्याने रस्त्यावर नदीचं स्वरूप पाहायला मिळत आहे. पुणे शहरात पावसामुळे स्वारगेट बसस्थानक पाण्यात गेल्याचं पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

Mrunal Dusanis: ४ वर्षांनी मायदेशी परतली, आधी मालिकेत पुनरागमन अन् आता नवऱ्यासोबत व्यवसायात पदार्पण;मृणाल दुसानिसचं मोठं पाऊल

IND vs AUS: चेतेश्वर पुजाराची बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत एन्ट्री! या नव्या भूमिकेत दिसणार

SCROLL FOR NEXT