Pune Flood Update Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Flood Video: पुण्यात पावसाची विश्रांती, पूरही ओसरला तरी पुणेकरांमध्ये भीती कायम; घरामध्ये आले साप-विंचू

Pune Flood Update: पुण्यात पावसाने विश्रांती घेतली. पूराचे पाणी देखील ओसरले आहे. पण अनेक ठिकाणी या पूराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये साप, विंचू, किडे, मासे आले आहेत.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

पुण्यामध्ये सलग ३ दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे (Pune Rain) गुरूवारी पूरस्थिती निर्माण झाली होती. या पाऊस आणि पूरामुळे पुणेकरांचे मोठे नुकसान झाले. आता पुण्यात पावसाने विश्रांती घेतली. पूराचे पाणी देखील ओसरले आहे. पण अनेक ठिकाणी या पूराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये साप, विंचू, किडे, मासे आले आहेत. त्यामुळे पाऊस आणि पूर गेला असला तरी देखील पुणेकरांमध्ये भीती कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पुण्यातल्या खिलारेवाडीतील नागरिकांच्या घरात अजूनही पूराचे पाणी आहे. खडकवासला धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पुण्यात पूर आला होता. या पूराच्या पाण्याने खिलारेवाडीला वेढा घातला होता. पूराचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरले होते. याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या घरात अजूनही पूराचे पाणी आहे. पूराच्या पाण्यातून वाहून आलेले साप, विंचू, मासे, किडे खिलारेवाडीतील नागरिकांच्या घरामध्ये आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. अजूनही खिलारेवाडीतील नागरिक घरांमध्ये आलेले पाणी बाहेर काढत आहेत.

पुण्यामध्ये पाऊस आणि पूरामध्ये अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. सिंहगड रोड भागातील सोसायटीच्या परिसरात वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. मात्र काही भागात पूरसदृश्य परिस्थिती नसताना देखील वीजपुरवठा खंडित केला गेला आहे. परिणामी नागरिकांना पाण्याची मोटर सुरू करता येत नाही. त्यामुळे सोसायटीत पाणी नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

पुण्यात आलेल्या पूरामुळे बाबा भिडे पाण्याखाली गेला होता. आता या पुलावरील पाणी कमी झाल्याने हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. पूजामुळे बाबा भिडे पुलावर मोठ्या प्रमाणावर राडारोडा येऊन अडकला आहे. अशामध्ये खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा कमी करण्यात आला आहे. खडकवासला धरणातून आता फक्त 13 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. 31 हजार क्युसेकवरून पाण्याचा विसर्ग कमी करत तो फक्त 13 हजार क्युसेक करण्यात आला आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पाऊस थांबल्याने प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात फक्त ₹७ लाखांत घर, म्हाडाची बंपर लॉटरी; हक्काच्या घरासाठी आजच अर्ज करा

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा महिला आघाडीचे आंदोलन, माझं कुंकू , माझा देश आंदोलन

Vasai Fort History: प्राचीन व्यापार केंद्र म्हणून ओळखला जाणारा वसई किल्ला, जाणून घ्या त्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये

Colorful Snakes : भारतातले रंगीबेरंगी आणि विषारी साप कोणते?

Disha Patani: घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर दिशा पटानीचा पहिला पब्लिक अपीयरन्स; पाहा व्हायरल VIDEO

SCROLL FOR NEXT