Devendra Fadnavis: पूरसदृश्य परिसराची पाहाणी करण्यासाठी फडणवीस नागपुरात; संतप्त नागरिकांनी घातला घेराव

Devendra Fadnavis In Nagpur: परिसराची पाहाणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात दाखल झाले.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSaam TV
Published On

Nagpur Flood:

नागपुरात शनिवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. आज सकाळपासून पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. पावसामुळे नागपूरमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. सुमारे ४ तास सलग पाऊस बरसल्याने संपूर्ण शहरातील बराच भाग पाण्याखाली गेला. अशात परिसराची पाहाणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात दाखल झाले. यावेळी संपप्त नागरिकांनी त्यांना घेराव घातला. (Latest Marathi News)

Devendra Fadnavis
Nagpur News: बांधकाम सुरू असताना लोखंडी सळई निसटली अन् थेट चिमुकल्याच्या डोक्यात शिरली; नागपुरातील धक्कादायक घटना

अंबादरी परिसराची पाहाणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस दाखल होताच त्यांनी काही घरांमध्ये जाऊन पाहाणी केली. तसेच नंतर ते आपल्या वाहनातून निघाले असताना काही संतप्त नागरिकांनी त्यांना घेराव घातला. घरात पाणी शिरल्याने येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

पावसामुळे तब्बल १० हजार नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलंय. तसेच ३ जणांना आपला जीव गमवावा लागलाय. पावसाने अंबादरी तलाव परिसरात ६ ते ७ फूटांपर्यंत पाणी साचलं होतं. या परिसरातील नाला देखील ओव्हरफ्लो झाला होता. या नाल्यावर काही बांधकाम करण्यात आलेलं आहे. त्यामुळे पाणी ओव्हरफ्लो होऊन नागरिकांच्या घरांमध्ये शिरलं, असं म्हटलं जातंय.

पूरसदृश्य परिस्थितीवर काल माध्यामांशी संवाद साधताना फडणवीसांनी म्हटलं की, "नागपुरात आता काही पुलं नव्याने बांधले जातील. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. ज्यांच्या घरात पाणी शिरलेय त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आलीये." परिसरात पाणी भरल्याने अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता. तो आता सुरळीत करण्यात आला आहे.

Devendra Fadnavis
Nagpur Rain News: नागपुरात पावसाचा कहर! रस्त्यांवर, घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ; शाळा- महाविद्यालयांना सुट्टी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com