Pune Railway Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Railway: रेल्वेची फुकट्या प्रवाशांवर धडक कारवाई; पुण्यात 6 लाखांचा दंड वसूल

Railway Action Against Ticketless Passenger: मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने फुकट्या प्रवाशांवरील कारवाई सध्या तीव्र केली आहे. यावर्षीच्या सुरूवातीलाच म्हणजे जानेवारी महिन्यात २७ हजार ८०१ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pune Railway Action Against Ticketless

पुण्यात रेल्वे मार्गावर सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबवली जातेय. रेल्वे मार्गावरील गाड्यांतुन विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात येत आहे. पुणे रेल्वे विभागाने फुकट प्रवास करणाऱ्या (Pune Railway) प्रवाशांवर कारवाई सुरू केली आहे. जानेवारी महिन्यात (January 2024) २७ हजार ८०१ फुकट्या प्रवाशांवर रेल्वे विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

रेल्वेची फुकट्या प्रवाशांवर कारवाई

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने फुकट्या प्रवाशांवरील कारवाई तीव्र केलीय. जानेवारी महिन्यात विनातिकीट, अनियमित तसंच सामानाची नोंदणी न करता प्रवास करणाऱ्या २७ हजार ८०१ जणांवर कारवाईचा दंडुका (Pune Railway Action) उगारण्यात आलाय. गेल्या महिन्यात या कारवाईतून रेल्वेने दररोज सरासरी ६ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

१ कोटी ७२ लाख रुपयांचा दंड वसूल

पुणे विभागाने जानेवारी महिन्यात विनातिकीट प्रवासी (Railway Ticketless Passenger), अनियमित प्रवास आणि सामान नोंदणी न करता घेऊन जाणाऱ्या २७ हजार ८०१ प्रवाशांकडून १ कोटी ७२ लाख रुपयांचा दंड वसूल केला. गेल्या महिन्यात या मोहिमेत तिकीट तपासणी दरम्यान १९ हजार ८५९ प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून आले.

रेल्वे कायद्यांतर्गत दंड

रेल्वे प्रशासनाकडून तिकीट तपासणी मोहीम सातत्यानं सुरू आहे. प्रवाशांनी योग्य (Pune Railway) तिकीट घेऊन प्रवास करावा, असं आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आलंय. विनातिकीट प्रवास केल्यास संबंधित प्रवाशांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल. अन्यथा दंड न भरल्यास तुरुंगवास देखील होऊ शकतो.

विनातिकीट प्रवास कायद्याने गुन्हा

रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी योग्य आणि वैध तिकिटांसह प्रवास करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यामुळे फुकट्या प्रवाशांना चांगलाच आळा बसणार आहे.

प्रवाशांनी (Railway Passenger) तिकिट काढून आरामदायी प्रवास करावा, असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलंय. विनातिकीट प्रवास करणं हा कायदेशीर गुन्हा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

DY chandrachud : एखादा पक्ष ठरवणार का, सुप्रीम कोर्टात निर्णय काय घ्यायचा? ठाकरे गटाच्या आरोपांना चंद्रचूड यांचं प्रत्युत्तर

Saim Ayub: वनडे क्रिकेटच्या इतिहासात जे कोणालाच जमलं नाही, ते सॅम अयूबने करुन दाखवलं

SCROLL FOR NEXT